मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Malegaon news : मालेगावात माजी महापौरावर गोळीबार! हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी; तीन गोळ्या झाडल्या

Malegaon news : मालेगावात माजी महापौरावर गोळीबार! हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी; तीन गोळ्या झाडल्या

May 27, 2024 09:12 AM IST

Firing On Ex-Mayor in Malegaon: मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांचावर काही अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत.

मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांचावर काही अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे
मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांचावर काही अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे

Firing On Ex-Mayor in Malegaon : मालेगाव गोळीबाराच्या गोळीबाराच्या घटनेने हादरले आहे. एमआयएमच्या माजी महापौरांवर रविवारी रात्री अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या असून या हल्ल्यात माजी महापौर हे गंभीर जखमी झाले आहेत. अब्दुल मलिक युनूस रझा असे त्यांचे नाव असून हल्लेखोर फरार झाले आहे. या घटनेमुळे मलेगांवात तणावाचे वातावरण आहे. या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अब्दुल यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral news: लाखो रुपये खर्च करून बनला कुत्रा; तरीही इच्छा पूर्ण झाली नाही; आता 'या' माणसाला व्हायचे आहे लांडगा आणि पांडा

अब्दुल मलिक हे सध्या एएमआयएमचे मालेगाव महानगर अध्यक्ष आहेत. ते माजी महापौर देखील राहिले आहे. रविवारी रात्री १२ च्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत त्यांना तीन गोळ्या लागल्या असून १ हातावर, १ पायावर आणि १ गोळी छातीवर लागली आहे. त्यांना तातडीने नाशिक येथील दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.

Cyclone Remal : रेमल चक्रीवादळ बंगालला धडकले! १२० किमी वेगाने वाहू लागले वारे, पावसाने झोडपले, १ लाख लोकांचे स्थलांतर

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल मलिक हे मालेगाव येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गवर मलिक एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसलेले असताना दुचाकीवरुण आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर ते फरार झाले. या घटनेनंतर शहरात तणावाचं वातावरण असून, पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

मालेगावचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी भेट घेत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. या घटनेचा मदार मौलाना मुफ्ती यांनी निषेध केला असून पोलिसांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मलिक यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना शोधून त्यांना अटक करण्याचीही मागणी देखील आमदार मौलाना मुफ्ती यांनी केली आहे. राजकीय वादातून हा गोळीबार झाल्याची चर्चा आहे. सध्या मालेगावमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. 

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग