मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MNS Leader Firing: चंद्रपूरमध्ये मनसे कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार; परिसरात खळबळ

MNS Leader Firing: चंद्रपूरमध्ये मनसे कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार; परिसरात खळबळ

Jul 05, 2024 09:48 AM IST

Firing on MNS District President: महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर चंद्रपूरमध्ये अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर गोळीबार
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर गोळीबार

Chandrapur Firing News: महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर चंद्रपूरमध्ये अज्ञातांनी गोळीबार केला. ही घटना शहरातील मध्यवर्ती आझाद बगिचाजवळील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी कॉम्प्लेक्स परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या खळबळजनक घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अमन अंदेवार यांच्या पाठीत गोळी लागल्याचे समजत आहे. त्यांना प्राथमिक उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूरला रेफर करण्यात आले. गोळीबार प्रकरणामुळे शहरात भीतीचंं वातावरण निर्माण झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे. २०२० मध्ये कोळसा व्यापारी सूरज बहुरिया यांच्या हत्येशी संबंध जोडला जात आहे. अमन आंदेवारसह त्याचा भाऊ आकाश उर्फ ​​चिन्ना आंदेवार, अल्फ्रेड उर्फ ​​बंटी लॉजिस्ट अँथनी, प्रणय राजू सहगल, बादल वसंत हरणे, बल्लारपूर येथे राहणारे अविनाश उमाशंकर बोबडे यांचा बहुरिया हत्या प्रकरणात सहभाग होता. दारू आणि कोळसा तस्करीतून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सूरजच्या हत्येच्या काही दिवसांपूर्वी आरोपी अमन आंदेवार यांनी त्यांच्या व्हॉट्सॲपवर 'जंगल जंगल राहील, पण सिंह बदलेल' असे स्टेटस ठेवले होते. त्यामुळे सूरज बहुरियाची हत्या हा सुनियोजित कट होता, असे बोलले जात होते. अमन अंदेवारचा भाऊ आकाश उर्फ ​​चिन्ना अंदेवार याच्यावर सूरज बहुरिया यांच्या समर्थकांनी दीड ते दोन वर्षांपूर्वी रघुवंशी संकुलात गोळीबार केला होता. आता पुन्हा ही घटना घडली.

आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी

कामगार नेते अमन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध केला आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांनी पोलिसांकडे केली आहे.

अटकेसाठी जिल्ह्यात नाकाबंदी

आरोपींना पकडण्यासाठी कॉम्प्लेक्स परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. पोलीस विभागाची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. लवकरच आरोपी पकडले जातील, अशी माहिती पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली.

WhatsApp channel
विभाग