Mumbai Firing : मुंबई हादरली! सायन कोळीवाडा परिसरात पहाटे ठोठावले दार; उघडताच गोळीबार, एक जखमी-firing in mumbai sion koliwada area one person injured ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Firing : मुंबई हादरली! सायन कोळीवाडा परिसरात पहाटे ठोठावले दार; उघडताच गोळीबार, एक जखमी

Mumbai Firing : मुंबई हादरली! सायन कोळीवाडा परिसरात पहाटे ठोठावले दार; उघडताच गोळीबार, एक जखमी

Apr 06, 2024 04:08 PM IST

Mumbai Firing : पॅरोलवर सुटून आलेल्या व्यक्तीने पहाटेच्या सुमारास दार ठोठावून दार उघडताच गोळीबार केला.सायन कोळीवाडा (SionKoliwada) परिसरात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

सायन कोळीवाडा परिसरात गोळीबार (संग्रहित छायाचित्र)
सायन कोळीवाडा परिसरात गोळीबार (संग्रहित छायाचित्र)

राज्यत गेल्या काही महिन्यापासून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज गोळीबाराच्या घटनेने मुंबई पुन्हा हादरली आहे. मुंबईतील सायन कोळीवाडा (Firing in  Mumbai sion koliwada) परिसरात गोळीबाराची घटना समोर आली आहे. पॅरोलवर सुटून आलेल्या व्यक्तीने पहाटेच्या सुमारास दार ठोठावून दार उघडताच गोळीबार केला. सायन कोळीवाडा परिसरात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. 

या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू हेत. मुंबई पोलीस तसेच गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाकडून या घटनेचा तपास केला जात आहे. आज (शनिवार) पहाटे पाच वाजता हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सायन कोळीवाडा परिसरात एका घराचे पहाटेच्या सुमारास दार ठोठावण्यात आले. दार उघडताच गोळीबार केला गेला. पैशाच्या वादातून हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला तो व्यक्ती घरात एकटात रहात असतो. सायन कोळीवाडा परिसरातील चर्चच्या बाजूला हा व्यक्ती राहतो. आज पहाटे पाचच्या सुमारास आरोपीने या व्यक्तीचा दरवाजा ठोठावला व दरवाजा उघडताच गोळीबार करण्यात आला. बंदुकीतून दोन राऊंड फायर केल्याची माहिती समोर येत आहे. या गोळीबारात व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला. त्याला शेजाऱ्याने सायन रुग्णालयात दाखल केले. गोळीबार केल्यानंतर आरोप घटनास्थळावरून पसार झाला. 

अँटॉप हिल पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. दोन व्यक्तींच्या अंतर्गत वादातून हा गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे.  राज्यात मागील काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. जानेवारी महिन्यात पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मोहोळ  टोळीतीलच काही तरूणांनी त्याच्यावर भरदुपारी त्याच्या घराच्या परिसरातच गोळ्या घालून त्याला संपवलं होते. 

त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. यात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड जखमी झाला होता. त्यानंतर अभिषेक घोसाळकरच्या हत्येने राज्यात खळबळ माजली होती. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर याप्रकरणावर जोरदार निशाणा साधला होता. दहीसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असलेल्या मॉरिस याने फेसबुक लाईव्ह करत गोळ्या झाडल्या होता. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेवर अनेक प्रकारचे वाद सुरू असून याचा तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप घोसाळकर कुटूंबाने केला आहे.

विभाग