Dhananjay Sawant : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार-firing in front of house of dhananjay sawant nephew of health minister tanaji sawant in paranda dharashiv ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dhananjay Sawant : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार

Dhananjay Sawant : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार

Sep 13, 2024 12:05 PM IST

Firing on Dhananjay Sawant in Dharashiv : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सांवत यांचे पुतणे धनंजय सावंत (Dhananjay Sawant) यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांच्या धारशिव येथील घरासमोर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या घरासमोर गोळीबार; थोडक्यात बचावले
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या घरासमोर गोळीबार; थोडक्यात बचावले

Firing on Dhananjay Sawant in Dharashiv : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतणे धनंजय सावंत यांच्यावर त्यांच्या घरासमोर गोळीबार करण्यात आला. ही घटना धारशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील सोनारी येथील त्यांच्या घरासमोर गुरुवारी रात्री घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

काय आहे घटना ?

धनंजय सावंत यांचे सोनारी येथे घर आहे. गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास काही हल्लेखोर हे दुचाकीवरून आले. त्यांनी सावंत यांच्या घरावर गोळीबार केला. सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते दुचाकीवरून फरार झाले. याप्रकरणी सावंत यांच्या सुरक्षारक्षकांनी आज आंबी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. धनंजय सावंत यांच्यावर कुणी हल्ला केला याची माहिती समजू शकली नाही. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

शेतकऱ्यांशी झाला होता वाद

दोन दिवसांपूर्वी दोन दिवसांपूर्वी खंडेश्वरी प्रकल्प पूजनाच्या वेळी मंत्री तानाजी सावंत व स्थानिक शेतकऱ्यांमध्ये वाद झाला होता. या वादादरम्यान, धनंजय सावंत यांनी शेतकऱ्यांना दमबाजी केली होती. यावेळी शेतकाऱ्यांकडून धोका असल्याचं सावंत यांनी म्हटलं होत. दरम्यान, यानंतर आज धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याने हा हल्ला नेमका कुणी केला हा प्रश्न निर्माण झाला आहे.

उद्या धारशिवमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मोठी सभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या शनिवारी (दि १४) परंडा येथे मोठी सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, या सभेच्या एक दिवसापूर्वी ही घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Whats_app_banner
विभाग