Dehu Crime News : पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कोयता गँगचा धुमाकूळ सुरू असतांना खून दरोडे आणि चोरीच्या घटना देखील वाढल्या आहेत. संत नगरी असलेल्या देहू नगरीत देखील गुन्हेगारी वाढली असून मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत एक जण ठार झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री गांधीनगर परिसरात घडली आहे. जुन्या भांडणाच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
विक्रम गुरुस्वामी रेड्डी असे या घटनेत ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. देहूरोड येथे काही सराईत गुंड हे वाढदिवसाचा कार्यक्रम करत होते. यावेळी जुन्या वादातून सराईत गुन्हेगाराकडून हा गोळीबार करण्यात आल. या घटनेमध्ये विक्रम रेड्डी हा जखमी झाला. त्याला तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. विक्रम गुरुस्वामी रेड्डी असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर नंदकिशोर यादव याच्या चेहऱ्यावर मोठ्या जखमा झाल्या आहेत. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले असून पोलिस तपास सुरू आहे.
चाकण एमआयडीसीमध्ये देखील गोळीबार झाला असून चुलत भावाने आपल्या भावाला जीवे मारण्याची सुपारी दिली होती. कौटुंबिक वादातून ही घटना घडली. संग्राम सिंग असे आरोपी चुलत भावाचे नाव असून त्याने ही सुपारी दिली होती. तर अजय सिंग याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. संग्राम सिंग हा कैलास स्टील कंपनीच्या प्रवेशद्वारावर अल असताना चार आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी रोहित पांडेला उत्तर प्रदेशातून अटक केली. यानंतर या घटनेचे बिंग फुटले.
संबंधित बातम्या