Pune Crime News : पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. चाकण आणि इंदारपूर येथील गोळीबाराच्या घटना ताज्या असतांना पुण्याच्या कात्रज परिसरात बुधवारी रात्री क्रिकेट खेळण्याच्या वादातून गोळीबार करण्यात आला असून यात दोघे जण जखमी झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कात्रज येथे काल क्रिकेट सामने सुरू होते. दोन गटात सामने सुरू असतांना अचानक क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला. दरम्यान, हा वाद सोडवण्यासाठी दोन्ही गटाचे काही तरुण पुन्हा बुधवारी भेटले. दरम्यान, यातील एका गटातील उमेदवार हा रेकॉर्ड वरील अट्टल गुन्हेगार होता. वाद मिटवत असतांना पुन्हा वाद वाद झाला.
हा वाद विकोपाला गेल्याने तरुणांमध्ये भांडणे झाली. यावेळी एका तरुणाने समोरच्या गटात असणाऱ्या तरुणावर बंदूक ताणत गोळीबार केला. यात दोघे जण जखमी झाले. दरम्यान, या ठिकाणी गोंधळ उडाला. येथे जमलेले तरुण जिवाच्या आकांताने पळून गेले. तर दोन जखमी तरुणांना त्याच्या मित्रांनी दवाखान्यात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून काही जणांना अटक करण्यात आली आहे.
पुण्यात कोयता, बंदुकी मिळणे नित्याचेच झाले आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला जरब बसवण्यास पोलिस आयुक्त कमी पडले आहे. काही मोजक्या कारवाया सोडल्या तर कोयता गँगचे हल्ले गोळीबार या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. यामुळे शिक्षणाचे माहेर घर आणि सांस्कृतिक राजधानी ही पुण्याची ओळख आता पूसली जात असून गुन्हेनगरी म्हणून पुण्याची ओळख होत आहे.
संबंधित बातम्या