पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात तब्बल ३५ ठिकाणी अग्नितांडव! अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवित हानी टळली
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात तब्बल ३५ ठिकाणी अग्नितांडव! अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवित हानी टळली

पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात तब्बल ३५ ठिकाणी अग्नितांडव! अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवित हानी टळली

Nov 02, 2024 07:47 AM IST

Pune Fire news : पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आगीच्या तब्बल ३५ घटना घडल्या. अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी जात आग आटोक्यात आणल्याने मोठ्या दुर्घटना टळल्या.

पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात तब्बल ३५  ठिकाणी अग्नितांडव! अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवित हानी टळली
पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात तब्बल ३५ ठिकाणी अग्नितांडव! अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवित हानी टळली

Pune Fire News : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी शहरातील वेगवेगळ्या भागात तब्बल ३५  ठिकाणी आग लागण्याच्या घटना उघडकीस आल्या. अग्निशमन दलाने तातडीने केलेल्या कारवाईमुळे मोठ्या दुर्घटना तळल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी अथवा जीवित हानी झाली नाही. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आल्याने या घटना घडल्या.

अग्निशामक दलाने दिलेल्या महतीनुसार आळंदी रस्त्यावरील कळस गावात कचऱ्यावर पेटता फटका पडल्याने मोठी आग लागली होती. ही घटना सुकरवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास घडली. तर मांजरीतील मोरे वस्ती परिसरात देखील उसाच्या शेतात फटाका पडल्याने मोठी आग लागली होती. हडपसर अग्निशमन दलाच्या केंद्रातील अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जात आगी आगीवर पाण्याचा मारा करनु आग आटोक्यात आणली. तर बालेवाडीतील काका हलवाई मिठाई दुकानासमोर पेटता फटका पडल्याने महावितरणच्या विद्युत तारेने पेट घेतला. कोथरुड येथील रामबाग कॉलनीत पेटता फटका पडल्याने झाडाने पेट घेतला.

मार्केट यार्ड परिसरात ट्रकमधील कचरा पेटला

मार्केट यार्डातील प्रवेशद्वार क्रमांक पाच परिसरात लावलेल्या वाहनातील कचऱ्याने पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. सहकारनगर पोलीस चौकीजवळ एका नारळाच्या झाडाला आग लागली. बंडगार्डन रस्ता परिसरातील मंगलदास चौकीजवळ एका झाडाला आग लागली. गणेश पेटेतील बुरुड आळीत ताडीपत्रीवर पेटता फटका पडल्याने आग लागली. रविवार पेठेतील तांबाेळी मशिदीजवळ कपड्याच्या दुकानात फटाक्याची ठिणगी उडून आग लागली. तर कात्रजमधील संतोषनगर परिसरात एका घराच्या गॅलरीत पेटत्या फटाक्यामुळे आग लागली.

या ठिकाणी घडल्या आगीच्या घटना

१) रात्री ०७•३५ - कळस येथे रस्यावर कचरा पेटला (धानोरी अग्निशमन केंद्र वाहन)

२) ०७•३६ - मांजरी, मोरे वस्ती येथे ऊसाच्या शेतामध्ये आग (हडपसर अग्निशमन केंद्र, एक वॉटर टँकर)

३) ०८•०५ - बालेवाडी फाटा, काका हलवाई स्वीट समोर वायर पेटली (पाषाण अग्निशमन केंद्र वाहन)

४) ०८•०६ - कोथरुड, रामबाग कॉलनी येथे झाडाला आग (कोथरुड अग्निशमन केंद्र वाहन)

५) ०८•१२ - मार्केटयार्ड, गेट क्रमांक पाचजवळ कचरयाच्या वाहनामधील कचरा पेटल्याने आग (गंगाधाम अग्निशमन केंद्र वाहन)

६) ०८•१९ - सहकारनगर पोलिस चौकीजवळ नारळाच्या झाडाला आग (जनता अग्निशमन केंद्र वाहन)

७) ०८•२२ - मंगलदास रस्ता येथे झाडाला आग (नायडू अग्निशमन केंद्र वाहन)

८) ०८•२४ - गणेश पेठ, बुरुड आळी येथे ताडपञी पेटल्याने आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)

९) ०८•३० - काञज, संतोषनगर येथे इमारतीच्या गॅलरीमध्ये आग (काञज अग्निशमन केंद्र वाहन)

१०) ०८•३४ - रविवार पेठ, तांबोळी मस्जिद नजीक कपड्याच्या दुकानात आग (कसबा अग्निशमन केंद्र वाहन)

११) ०८•३८ - बी टी कवडे रस्ता, भारत फोर्ज कंपनी समोर एका ट्रकला आग (बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र वाहन)

१२) ०८•४० - लक्ष्मी रोड, विजय टॉकीज जवळ घरामध्ये आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)

१३) ०८•४५ - कळस स्मशानभूमी जवळ एका शेतामध्ये आग (धानोरी अग्निशमन केंद्र, येरवडा अग्निशमन केंद्र वाहन)

१४) ०८•५४ - टिळक रस्ता, महाराष्ट्र मंडळ शेजारी झाडाला आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)

१५) ०९•०१ - सिहंगड रोड, नवश्या मारुती जवळ घरामध्ये आग (सिहंगड रोड अग्निशमन केंद्र वाहन)

१६) ०९•०३ - औंध, बीआरटीएस रस्ता येथे घरामध्ये आग (औंध अग्निशमन केंद्र वाहन)

१७) ०९•११ - गणेश पेठ, डुल्या मारुती मंदिराजवळ छोट्या गोडाउनमध्ये आगीची घटना (कसबा अग्निशमन केंद्र, मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वॉटर टँकर)

१८) ०९•२३ - वडगाव बुद्रुक, गोसावी वस्ती येथे घरामध्ये आग (पीएमआरडीए अग्निशमन वाहन)

१९) ०९•२५ - कल्याणीनगर, गोल जिम चौक येथे मोकळ्या मैदानात आग (नायडू अग्निशमन केंद्र वाहन)

२०) ०९•२९ - गणेश पेठ, बुरुड आळी येथे पुन्हा ताडपञीला आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)

२१) ०९•३५ - चंदननगर, खराडी बायपास येथे कचरा पेटला (येरवडा अग्निशमन केंद्र वाहन)

२२) ०९•४० - शिवणे, दांगट पाटील नगर येथे कपड्याच्या गोडाऊनमध्ये आग (कोथरुड, वारजे, एरंडवणा, काञज, नवले अग्निशमन केंद्र वाहन व दोन वॉटर टँकर)

२३) ०९•४२ - पदमावती, पंचवटी मिञ मंडळ येथे गॅलरीमधे आग (गंगाधाम अग्निशमन केंद्र वाहन)

२४) ०९•५५ - सासवड रोड, सोनाई गार्डन जवळ पीव्हीसी पाईप गोडाऊनला आग (कोंढवा बुद्रुक व टँकर आणि काळेपडल अग्निशमन केंद्र वाहन)

२५) १०•०१ - गंज पेठ, महात्मा फुले वाड्यानजीक कचरा पेटला (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)

२६) १०•०२ - हडपसर, डिपी रस्ता कचरा पेटला (बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र वाहन)

२७) १०•२७ - बिबवेवाडी, अप्पर डेपो येथे मोकळ्या मैदानात कचरा पेटला (गंगाधाम अग्निशमन केंद्र वाहन)

२८) १०•३४ - रास्ता पेठ, आयप्पा मंदिरा जवळ इमारतीत गॅलरीत आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)

२९) १०•५१ - खराडी, थिटे वस्ती येथे घरामध्ये आग (येरवडा अग्निशमन केंद्र व वॉटर टँकर)

३०) ११•०७ - कोथरुड, हॅप्पी कॉलनी येथे टपरीला आग (जनता अग्निशमन केंद्र वाहन)

३१) ११•४५ - गंगाधाम, आई माता मंदिराजवळ कचरा पेटला (गंगाधाम अग्निशमन केंद्र वाहन) 

३२) ०२.५० - हडपसर, रामटेकडी, आंबेडकर नगर लाकडांना आग (हडपसर अग्निशमन केंद्र वाहन)

३३) ०३.०१ - कॅम्प, पुलगेट बसस्टॅाप, सोलापुर बाजार कचरयाला आग (पुणे कॅन्टोमेंट व मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)

३४) ०५.०० - कोंढवा खुर्द,नवाजी चौक, मक्का मश्जिद जवळ बंद घराला आग (कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्र वाहन)

३५) ०६.३० - वाघोली, नगररोड, क्रोमा शोरूम मागे फ्लॅटमध्ये आग (पीएमआरडीए वाघोली, येरवडा अग्निशमन केंद्र वाहन)

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर