मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  kalamna fire: नागपूरमध्ये अग्नितांडव; कळमना एपीएमसीतील कोट्यवधींची लाल मिरची जळून खाक

kalamna fire: नागपूरमध्ये अग्नितांडव; कळमना एपीएमसीतील कोट्यवधींची लाल मिरची जळून खाक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Nov 23, 2022 10:29 AM IST

Kalamna APMC Fire News: नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्यरात्री २ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत बाजारसमितीत ठेवण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची मिरची जळून खाक झाली.

आगीवर नियंत्रण मिळवताना कर्मचारी
आगीवर नियंत्रण मिळवताना कर्मचारी

Kalamna APMC Fire News: नागपूर येथील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्यरात्री २ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात ठेवलेली लाल मिरची ही जळून खाक झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशी लागली याचे कारण समजू शकले नाही. फायरब्रीगेडच्या गाड्या घटणस्थली पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

नागपूरमधील कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती ही मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. या बाजार समितीत मध्यरात्री अचानक आग लागली. काही वेळात आगीने भीषणरूप धारण केले. बाजार समितीच्या आवारात एका शेडमध्ये कोट्यवधी रुपयांची मिरची ठेवण्यात आली होती. ही लाल मिरची आगीत जळून खाक झाली आहे.

बाजार समितीतून आगीचे लोट येतांना दिसतात याची तात्काळ माहिती ही अग्निशामक दल आणि पोलिसांना देण्यात आल. ही बाजार समिती नागपूर शहराच्या बाहेरच्या बाजूने आहे. त्यामुळे घटनास्थळी पोहचे पर्यन्त मोठा वेळ झाला. दरम्यान, आगीने उग्ररूप धरण केले होते. अग्निशामक दल घटनास्थळी पोहचल्यावर काही वेळात आगीवर नियंत्रन मिळवण्यात आले. दरम्यान, बाजार समिती प्रशासनाने झालेल्या नुकसानीची माहिती दिली आहे. बाजार समितीत शेडमध्ये इलेक्ट्रिसिटीचे काम सुरू होते. हे काम अपूर्ण होते. यामुळे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, चार ते पाच हजार पोती लाल मिरची जळून खाक झाली. या मिरचीची किंमत तब्बल १५ ते १७ कोटी रुपये असून या घटनेत ४० पेक्षा अधिक व्यापऱ्यांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, बाजार समितीच्या चुकीच्या कामामुळे ही आग लागली असून त्याचा फटका हा व्यापऱ्यांना बसला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग