Mumbai Grant Road Fire: मुंबईच्या कामाठीपुरा परिसरातील एका इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी न झाल्याची माहिती आहे.
मुंबईच्या ग्रँट रोड येथील कामाठीपुरा परिसरातील गल्ली क्रमांक ३ मध्ये आग लागली. एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीच्या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने मुंबई अग्निशमन विभागाच्या हवाल्याने दिली आहे.