Buldhana Fire: बुलढाण्यातील सर्वात मोठ्या मंगल कार्यालयाला आग, परिसरात भीतीचे वातावरण-fire broke out at srihari lawn in buldhana video goes viral on social media ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Buldhana Fire: बुलढाण्यातील सर्वात मोठ्या मंगल कार्यालयाला आग, परिसरात भीतीचे वातावरण

Buldhana Fire: बुलढाण्यातील सर्वात मोठ्या मंगल कार्यालयाला आग, परिसरात भीतीचे वातावरण

Sep 25, 2024 07:51 AM IST

Buldhana srihari lawn Fire: बुलढाण्यातील सर्वात मोठ्या मंगल कार्यालयाला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

 बुलढाण्यातील सर्वात मोठ्या मंगल कार्यालयाला आग
बुलढाण्यातील सर्वात मोठ्या मंगल कार्यालयाला आग

Buldhana News: बुलढाण्यातील खामगाव शहराजवळील मंगळ कार्यालय श्रीहरी लॉन्सला काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. लॉन्समध्ये अनेक एलपीजी सिलिंडर असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आगीचे कारण अस्पष्ट असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने, या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे समोर येत आहे. या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

मिळालेल्या माहितीनुसर, बुलढाण्यातील खामगाव शहराजवळ असलेल्या सुटाळा येथील श्रीहरी लॉन्सला मंगळवारी रात्री आग लागली. हे जिल्ह्यातील सर्वात मोठे लॉन्स असल्याचे बोलले जात आहे. ज्यावेळी आग लागली, तेव्हा लॉन्समध्ये १० ते १२ एलपीजी सिलिंडर होते. यामुळे स्फोट होण्याची भिती व्यक्त करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच नांदुरा येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अकोला येथूनही अग्निशमन दलाचे वाहने बोलविण्यात आली.

या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आगीने उग्र रुप धारण केल्याचे व्हिडिओत दिसत असून अग्निशमदलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही आग इतकी भीषण आहे की, काही वेळात संपूर्ण लॉन्सला विळख्यात घेतले. या आगीत संपूर्ण लॉन्स जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे.

ठाणे: वागळे इस्टेटमधील स्मशानभूमीजवळ दोन वाहनांना आग

ठाण्यातील वागळे औद्योगिक वसाहतीतील स्मशानभूमीजवळ मंगळवारी पहाटे रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांना आग लागली. ही घटना पहाटे ४ च्या सुमारास घडली असून ५० मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

आगीत दोन्ही गाड्या जळून खाक

ठाण्यातील एका प्राइम लोकलमध्ये दोन वाहनांना आग लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आगीची घटना वागळे इस्टेट पोलीस ठाण्यासमोरील ओमेगा बिझनेस पार्कजवळ आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील वागळे इस्टेट येथे मंगळवारी पहाटे कामगार नाका येथील स्मशानभूमीजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांची धडक बसल्याची घटना घडली. तात्काळ पोलीस कर्मचारी, अग्निशमन दल आणि बचाव वाहन घटनास्थळी दाखल झाले. आगीमध्ये एक छोटा टेम्पो आणि मारुती वॅगनआर कार जळून खाक झाली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Whats_app_banner
विभाग