Pune Susgaon fire: पुण्याच्या सुस गावात अग्नितांडव! ३ सिलेंडरचा स्फोटांमुळे कामगारांच्या झोपड्यांना आग!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Susgaon fire: पुण्याच्या सुस गावात अग्नितांडव! ३ सिलेंडरचा स्फोटांमुळे कामगारांच्या झोपड्यांना आग!

Pune Susgaon fire: पुण्याच्या सुस गावात अग्नितांडव! ३ सिलेंडरचा स्फोटांमुळे कामगारांच्या झोपड्यांना आग!

Mar 16, 2024 07:06 AM IST

Pune Susgaon fire: पुण्यातील सुस गावात एका (Pune susgaon) सोसायटीजवळ असलेल्या मंजुरांच्या झोपड्यांना भीषण आग लागली. या झोपड्यातील ३ सिलेंडरचा भीषण स्फोट झाला.

पुण्याच्या सुस गावात अग्नितांडव! ३ सिलेंडरचा स्फोटांमुळे कामगारांच्या झोपड्या भस्मसात झाल्या.
पुण्याच्या सुस गावात अग्नितांडव! ३ सिलेंडरचा स्फोटांमुळे कामगारांच्या झोपड्या भस्मसात झाल्या.

Pune Susgaon fire: पुण्यातील सुस गावात एका (Pune susgaon) सोसायटीजवळ असलेल्या मंजुरांच्या झोपड्यांना भीषण आग लागली. या झोपड्यातील ३ सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. यानंतर आगीने उग्र रूप धारण केले. या घटनेत २८ सिलेंडर भस्मसात झाले. सुदैवाने त्यांचा स्फोट झाला नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवित हानी अथवा कुणी जखमी झाले नाही. मात्र, कामगार कुटुंबाचा संसार उघड्यावर आला. अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी येत या आगीवर नियंत्रण मिळवले.

Maharashtra Weather Update: भर उन्हाळ्यात छत्र्या बाहेर काढा! विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचे; 'या' जिल्ह्यांना अलर्ट

सुस गाव येथे शेल पेट्रोल पंपाजवळ बेलाकासा सोसायटी जवळ असलेल्या कामगारांच्या झोपड्यांना आग लागल्याची माहिती पुणे अग्निशमन दलाला मिळाली. त्यानुसार पुणे पालिकेच्या पाषाण, कोथरुड, औंध, वारजे येथील फायर गाड्या  आणि एक पाण्याचा टँकर व हिंजवडी एमआयडीसी अग्निशमन वाहन व् पीएमआरडीएचे दोन अग्निशमन फायर गाड्या व वॉटर टँकर तसेच अशी एकुण ९ वाहने तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. 

मोठी बातमी! राज्यातील शिक्षकांना जीन्स-टी शर्ट वापरण्यास मनाई; ड्रेस कोड लागू होणार, नावाच्या आधी Tr. लागणार

घटनासथळी पोहोचताच या ठिकाणी पञ्याचे शेड असलेल्या झोपड्यांना मोठी आग असल्याचे जवानांनी पाहिले व तातडीने आगीत कुणी अडकले आहे का ? याची पाहणी करण्यात आली. या साठी आगीवर चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला व आग इतरञ इतर झोपड्यांमध्ये पसरु नये याची विषेश काळजी घेऊन आग तासाभरात आटोक्यात आणली. ३ सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने उग्र रूप धारण केले तसेच  अन्य काही झोपड्यांना सुद्धा या आगीने कवेत घेतले. घटनास्थळी घरगुती वापराचे छोटे मोठे असे एकुण २८ सिलेंडर जळाले.  अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी तसेच जिवितहानी  झाली नाही. कामगारांच्या एकुण ५० झोपड्या असून २० झोपड्या जळाल्या तर इतर ३० झोपड्यांना दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आगीपासून बचवल्या. या घटनेत कामगारांचे  घरगुती साहित्य व गृहोपयोगी वस्तू पुर्णपणे भस्मसात झाल्याने  मोठे नुकसान झाले. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

Electoral Bonds : इलेक्टोरल बाँड पंतप्रधान मोदींनी चालवलेले जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट; राहुल गांधींचा घणाघात

या कामगिरीत अग्निशमन दल प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर, शिवाजी मेमाणे, कमलेश सनगाळे व सुमारे तीस-चाळीस जवानांनी आगीवर नियंञण मिळवत पुढील अनर्थ टाळला.

पुणे महागर पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे म्हणाले, "आमच्या जवानांनी वेळेत पोहोचत आग इतरञ पसरु न देता मोठा धोका टाळला.  

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर