मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Fire : मुंबईच्या वांद्रे पूर्व येथील सरकारी कार्यालयाला आग, अग्निशमन दल घटनास्थळी

Mumbai Fire : मुंबईच्या वांद्रे पूर्व येथील सरकारी कार्यालयाला आग, अग्निशमन दल घटनास्थळी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 13, 2024 05:52 PM IST

Mumbai Government office Fire: मुंबईच्या वांद्रे येथील सरकारी कार्यालयाला आग लागली.

 मुंबईच्या वांद्रे येथील सरकारी कार्यालयाला आग लागल्याने परिसरात खळबळ माजली.
मुंबईच्या वांद्रे येथील सरकारी कार्यालयाला आग लागल्याने परिसरात खळबळ माजली.

Mumbai Fire News Today: मुंबईच्या वांद्रे येथील सरकारी कार्यालयाला आग लागल्याची घटना उघडकीस आली. कार्यालयाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली.

ट्रेंडिंग न्यूज

एएनआय वृत्तसंस्थेने मुंबई महानगर पालिकेच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे पूर्व येथील सरकारी कार्यालयाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. लेव्हल १ ची ही आग आहे. या आगीत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. ही आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली.

Pune cyber crime : मॅट्रीमोनिअल साईटवरून झालेली ओळख पाडली महागात! इंजिनियर तरुणीला ४० लाखांनी गंडवले

छत्रपती संभाजीनगर: कपड्याच्या दुकानाला आग लागून एकाच कुटुंबातील ७ ठार

यापूर्वी, छत्रपती संभाजीनगर येथील एका कपड्याच्या दुकानाला आग लागल्याने एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना ३ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूच्या इमारतीत हे दुकान आहे. मृतांमध्ये तीन महिला, दोन पुरूष आणि दोन मुलांचा समावेश आहे. या इमारतीत एकूण १६ जण राहत होती. पहिल्या मजल्यावर सात, दुसऱ्या मजल्यावर सात आणि तिसऱ्या मजल्यावर दोन जण राहात होते. हमीदा बेगम (वय ५०), शेख सोहेल (वय ३५), वसीम शेख (वय ३०), तन्वीर वसीम (वय २३), रेश्मा शेख (वय २२), आसिम वसीम शेख (वय ३), परी वसीम शेख (वय २) असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या लोकांची नावे आहेत.

यवतमाळ: गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी घेऊन जाणारी रुग्णवाहिका अचानक पेटली!

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील गर्भवर्ती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने अचानक पेटल घेतला. वेळीच रुग्णवाहिकेच्या चालकाने प्रसंगावधान दाखवत गर्भवती महिलेसह दोन जणांना सुखरूप बाहेर काढले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊपर्यंत रुग्णवाहिका अक्षरक्ष: जळून खाक झाली.

 

IPL_Entry_Point

विभाग