मुंबईच्या गोवंडी उपनगरातील झाकीर हुसेन नगर भागात काही दुकानांना मंगळवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. झाकीर हुसेन नगर झोपडपट्टी बहुल परिसर असून एका इमारतीच्या तळमजल्यावरील चार ते पाच दुकानांना मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या दुकानांमध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, भंगार साहित्याचा साठा आणि पुठ्ठा कागद इत्यादीं जळून खाक झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
सविस्तर वृत्त लवकरच…