मुंबईतील मानखुर्द येथील मंडाळा स्क्रॅप यार्ड परिसरातील भंगार गोदामाला सोमवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि पाण्याचे आठ टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर ही आग लागली आहे.
मंडाळा येथील भंगार गोदामात लाकूड, प्लास्टिक आदि ज्वलनशील वस्तू मोठ्या प्रमाणात असल्याने आग पसरली व काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. या गोदामातून आगीचे धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या व ८ पाण्याचे टँकर दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले गेले.
अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि इतर वाहने आग विझवण्याचे काम करत आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली. मुंबई पोलीस आणि पालिकेचे कर्मचारीही घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत.
या घटनेत कोणीही जखमी झालेले नसून अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि इतर वाहने आग विझवण्याचे काम करत आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली. मुंबई पोलीस आणि पालिकेचे कर्मचारीही घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत.
मुंबईतील वरळी परिसरातील पूनम चेंबर्स परिसरातही १५ डिसेंबर रोजी आग लागली होती. सात मजली व्यावसायिक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून ही आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.१३ डिसेंबर रोजी लोअर परळ भागात पश्चिम रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये नियमित देखभाल करणाऱ्या रिकाम्या डब्याला आग लागली होती.ही घटना दुरुस्ती डेपोतील 'नॉन पॅसेंजर' भागात (जिथे प्रवाशांना प्रवेश करता येत नाही) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास लागली.
या घटनेत कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा झालेली नाही. अन्य कोणत्याही डब्यावर परिणाम झाला नाही, असे पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. मुंबई अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आग आटोक्यात आणली.
२७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील एका २२ मजली इमारतीला लागलेल्या आगीत एक महिला अग्निशमन कर्मचारी आणि तीन रहिवासी असे चार जण जखमी झाले आहेत. आग विझवण्याच्या मोहिमेदरम्यान डोंगरी परिसरातील 'अन्सारी हाइट्स' या निवासी इमारतीतून अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. आगीचे नेमके कारण समोर आलेले नाही. परंतु १४ व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली असावी, अशी शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली.
इमारतीच्या गच्चीवर दुपारी १ वाजून १० मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळताच २७ रहिवासी अडकले असून संपूर्ण जिन्यावर धुराचे लोट साचल्याने त्यांना पळून जाण्याचा मार्ग सापडला नाही, अशी माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.