मुंबईतील बोरिवली येथे कनकिया समर्पण टॉवरला आग; एकाचा मृत्यू, तीन जण जखमी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईतील बोरिवली येथे कनकिया समर्पण टॉवरला आग; एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

मुंबईतील बोरिवली येथे कनकिया समर्पण टॉवरला आग; एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

Updated Jul 25, 2024 07:02 PM IST

Mumbai Borivali Kanakia Samarpan Tower Fire: मुंबईतील बोरिवली कनकिया समर्पण टॉवरला आग लागल्याची घटना उघडकीस आली. या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण होरपळल्याची माहिती समोर आली.

मुंबईतील बोरिवली परिसरात आग
मुंबईतील बोरिवली परिसरात आग

Mumbai Fire News: मुंबईतील बोरिवली भागातील कनकिया समर्पण टॉवरला आज आग लागली. या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. जखमींना त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बोरिवली येथील मागाठाणे मेट्रो स्थानकासमोरील कनकिया समर्पण टॉवरमध्ये आज दुपारी १२:३७ मिनिटांनी आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस १०८ रुग्णवाहिका आणि वॉर्ड स्टाफसह विविध एजन्सी घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर जवळपास एक तासानंतर ही आग आटोक्यात आली. मात्र, या आगीत एक जाणांचा मृत्यू झाला आहे. तर, तर तीन जण जखमी झाले. नेमके कशामुळे आग लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

महेंद्र शाह असे आगीत गुदमरून मृ्त्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, रंजना राजपूत, शिवानी राजपूत आणि शोभा सावळे अशी जखमींची नावे आहेत. आगीच्या घटनेनंतर जखमींना त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

पालघर एमआयडीसीतील औषध निर्मिती कंपनीला आग

पालघर एमआयडीसीतील एका औषध निर्मिती कंपनीला रविवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून कारखान्यात आग पसरण्यापूर्वीच सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. पीव्हीसी वायर आणि पॅनेलसह इतर ज्वलनशील पदार्थ आणि पॅकिंग मटेरियलमुळे आग वेगाने पसरली. आगीची माहिती मिळताच तारापूर एमआयडीसीच्या दोन, बीएआरसी तारापूर, अदानी पॉवर प्लांट (डहाणू) आणि वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल चार तासांनंतर आग आटोक्यात आली. मात्र, या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाल्याने प्रचंड नुकसान झाले. कारखान्याच्या आवारात उभी असलेली काही वाहनेही जळाली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर