मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Fire: मुंबईतील वडाळा येथील ३८ मजली इमारतीला भीषण आग

Mumbai Fire: मुंबईतील वडाळा येथील ३८ मजली इमारतीला भीषण आग

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 23, 2024 10:52 AM IST

Mumbai building Fire News: मुंबईतील वडाळा येथील ३८ मजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली.

मुंबईतील वडाळा येथील एका ३८ मजली इमारतीला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली.
मुंबईतील वडाळा येथील एका ३८ मजली इमारतीला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली.

Mumbai Wadala Building Fire: मुंबईतील वडाळा येथील एका ३८ मजली इमारतीला शुक्रवारी (२२ मार्च २०२२) रात्री अकराच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनदलाला यश आले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, अँटॉप हिल येथील वडाळा बस डेपोजवळील दोस्ती अ‍ॅम्ब्रोसिया इमारतीच्या २६ व्या आणि २७ व्या मजल्यावर आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. प्राथमिक माहितीनुसार, या आगीच्या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नााही. आग आटोक्यात आणण्यासाठी मुंबई अग्निशमन दल, बेस्ट, पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि पालिकेचे कर्मचारी कार्यरत होते. आगीचे कारण अस्पष्ट असून स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ठाण्यात सात मजली इमारतीला आग

ठाण्यातील एका सात मजली निवासी इमारतीला सोमवारी (१८ मार्च २०२४) मध्यरात्री १ वाजून ४० मिनिटांनी आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन २२५ रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले. ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अग्निशमनदलासह आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि वीज पुरवठा कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पहाटे अडीच वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, या आगीच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

IPL_Entry_Point

विभाग