Turbhe Bus Depot Fire: नवी मुंबईतील तुर्भे बस डेपोला मंगळवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनदलाच्या जवानांना यश आले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.या घटनेत कोणतीही जीवितहानी न झाल्याचे वृत्त आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तुर्भे बस डेपोला मंगळवारी रात्री आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीत किती नुकसान झाले किंवा काही जिवीतहानी झाली आहे का? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. एएनआयने या आगीचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तुर्भे डेपोत उभा असलेल्या काही बसला आग लागल्याचे दिसत आहे. आग कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.