मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Fire: मुंबईच्या गोरेगाव येथील अस्मी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समध्ये आग

Mumbai Fire: मुंबईच्या गोरेगाव येथील अस्मी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समध्ये आग

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 24, 2024 10:52 PM IST

Mumbai Goregaon Fire: मुंबईत गोरेगाव येथील अस्मी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समध्ये आज आग लागल्याची घटना उघडकीस आली.

Mumbai Fire
Mumbai Fire

Mumbai Asmi Industrial Complex Fire: मुंबईत गोरेगाव येथील अस्मी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समध्ये आज (बुधवारी, २४ जानेवारी) आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नसून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईतील गोरेगाव परिसरातील एका बहुमजली इमारतीला बुधवारी भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत दूरवरून धुराचे लोट दिसत आहेत, जो लांबून स्पष्ट दिसत आहेत. गोरेगाव पश्चिम येथील महेश नगर येथील गोविंद जी श्रॉफ मार्गावरील अनमोल प्राईडमध्ये आग लागली.

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. आगीच्या घटनेनंतर लगेचच लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. आग नेमकी कशामुळे लागली? हे अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

WhatsApp channel

विभाग