Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

May 23, 2024 03:04 PM IST

Dombivli MIDC Fire: डोंबिवली एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट झाल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

डोंबिवली एमआयडीसीमध्ये आज दुपारी मोठा स्फोट झाला.
डोंबिवली एमआयडीसीमध्ये आज दुपारी मोठा स्फोट झाला.

Dombivli MIDC Boiler Explosion: डोंबिवली एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली. या स्फोटची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पण बॉयलरचा स्फोट झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली एमआयडीसी फेज दोनमध्ये हा स्फोट झाल्याचे समजत आहे. आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजुच्या परिसरात मोठा हादरा बसला. या स्फोटात अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. नेमका स्फोट कशामुळे झाला, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु, बॉयलरचा स्फोट झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आग इतर कंपन्यांमध्ये पसरली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, एमआयडीसीच्या बाजुला असलेल्या नागरिकांच्या घराच्या काचा फुटल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कामगारांसह नागरिकही जखमी

या स्फोटात पाच ते सहा कामगार जखमी झाले आहेत. याशिवाय, परिसरात राहणारे लोकही जखमी झाल्याचे समजत आहे, ज्यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. जखमींवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. काही महिन्यापूर्वीच डोंबिवली एमआयडीसीतील एका कंपनीत स्फोट झाला होता.

डोंबिवली एमआयडीसीतील कॅलेक्सी कंपनीला आग

काही दिवसांपूर्वी डोंबिवली येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहती मधील कॅलेक्सी कंपनीला आग लागल्याची घटना घडली. या आगीत एका कामगाराचा मृत्यू झाला होता. कंपनी कामगारांनी तात्काळ अग्निप्रतिबंधक यंत्रणेचा वापर करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीत एका कामगाराचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर