प्रेमासाठी वाट्टेल ते! पाकिस्तानातील प्रियकरशी लग्न करण्यासाठी ‘तिने’ बदलली ओळख; अबोटाबादमध्ये जाऊन केलं लग्न
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  प्रेमासाठी वाट्टेल ते! पाकिस्तानातील प्रियकरशी लग्न करण्यासाठी ‘तिने’ बदलली ओळख; अबोटाबादमध्ये जाऊन केलं लग्न

प्रेमासाठी वाट्टेल ते! पाकिस्तानातील प्रियकरशी लग्न करण्यासाठी ‘तिने’ बदलली ओळख; अबोटाबादमध्ये जाऊन केलं लग्न

Published Jul 24, 2024 09:58 AM IST

Thane news : ठाण्यातील एका विवाहितेने इन्स्टाग्रामवर भेटलेल्या पाकिस्तानातील तरूणाशी लग्न करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. त्यावर पासपोर्ट काढून ती पाकिस्तानमध्ये पळून जात प्रियकराशी लग्न केल्याचं उघड झालं आहे.

प्रेमासाठी वाट्टेल ते! पाकिस्तानातील प्रियकरशी लग्न करण्यासाठी ‘तिने’ बदलली ओळख; अबोटाबादमध्ये जाऊन केलं लग्न
प्रेमासाठी वाट्टेल ते! पाकिस्तानातील प्रियकरशी लग्न करण्यासाठी ‘तिने’ बदलली ओळख; अबोटाबादमध्ये जाऊन केलं लग्न

Thane news : तुम्ही सीमा हैदर आणि अंजु नसरूल्ला या दोघींचे नाव ऐकली असेलच. सीमा ही पाकिस्तानातून पळून जाऊन भारतात आली. तिने सचिन नामक तरूणाशी लग्न केले. तर अंजु हिने पाकिस्तानात पळून जाऊन तेथील एका युवकाशी लग्न केले. या घटना ताज्या असतांना मुळची उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेली आणि सध्या ठाण्यात राहणाऱ्या एका विवाहितेने इन्स्टाग्रामवर भेटलेल्या पाकिस्तानातील तरूणाशी लग्न करण्यासाठी खोटी कागद पत्रे तयार करून पाकिस्तानात पळून जाऊन लग्न केल्याचं उघड झाले आहे.

या विवाहितेला दोन मुली आहे. तिचा पती तिला नेहमी त्रास देत असे. त्याच्या वागणुकीला ही महिला वैतागली होती. दरम्यान, इन्स्टाग्रामवर तिची एका पाकिस्तानी तरूणाशी ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. तिच्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी या विवाहितेने तिची संपूर्ण ओळख बदलली. ही महिला तिच्या मुलींसह पाकिस्तानमध्ये पळून जाणार होती. या साठी तिने बनावट आधार कार्ड, बनावट पासपोर्ट तयार करून स्वत:ची नवी ओळख तयार केली. मात्र, या पूर्वीच पोलिसांना तिचा सुगावा लागण्याने त्यांनी तिला अटक केली.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही विवाहिता मुळची उत्तर प्रदेशची राहणारी आहे. तिचा पती तिला त्रास देत असल्याने ती पतीला सोडून मुलांसह ठाण्यात राहत असलेल्या तिच्या आईसोबत राहण्यासाठी गेल्या वर्षी आली. दरम्यान, सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर तिची पाकिस्तानमधील एका युवकाशी ओळख झाली. त्यांच्यात बोलणे वाढले आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसानंतर त्यांनी लग्न करायचे ठरवले. पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये एकत्र राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्या ठिकाणी तो काम करत होता.

ती विवाहित असणे तिच्या प्रेमात अडथळा ठरत होते. यामुळे तिचा पती तिचा माग काढून तिला पुन्हा माघारी घेऊन जाईल या भीतीने तिने, तिची संपूर्ण ओळख बदलण्याचा निर्णय घेतला. या साठी तिने तिचे नाव बदलले. खोटे कागद पत्र सादर करत बनावट आधार आणि पॅन कार्ड मिळवले. या सोबतच ठाण्यातील एका दुकानातून तिच्या मुलींचे नवीन जन्म प्रमाणपत्र बनवले. या बनावट कागदपत्रांचा वापर तिने पासपोर्ट तयार करण्यासाठी केला. पोलिसांनी तिची पडताळणी देखील केली.

तिने गेल्या ऑक्टोबरमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण केली, तिच्या मुलींसह एक महिन्याच्या व्हिसावर ती अबोटाबादला गेली आणि तिने तिच्या प्रियकराशी लग्न केले. तिथे राहून तिने सहा महिन्यांच्या व्हिसाच्या मुदतवाढीसाठी अर्ज केला. पण तिचा अर्ज नाकारण्यात आला. याची माहिती ही पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तांनी केंद्रीय एजन्सींना दिली. यामुळे तिच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले. गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या सुमारास ती ठाण्यात परत आली. यावेळी तिचे बिंग फुटले होते. तपास यंत्रणांनी आणखी तपास केला असता, तिने बनावट कागद पत्रे तयार करून ओळख बदलून पाकिस्तानात गेल्याचे उघड झाले. तिला बनावट कागदपत्रे तयार करण्यास मदत करणाऱ्या दुकानदाराविरुद्ध तसेच भारतीय पासपोर्ट कायद्याच्या संबंधित कलमांखाली २० जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर