मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marketyard Rape News : विवाहाचं आमिष दाखवून पोलीस उपनिरीक्षकाचा महिलेवर बलात्कार; दोघांवर गुन्हा

Marketyard Rape News : विवाहाचं आमिष दाखवून पोलीस उपनिरीक्षकाचा महिलेवर बलात्कार; दोघांवर गुन्हा

Jan 09, 2024 09:33 AM IST

Pune marketyard rape crime crime: पुण्यात एका महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune marketyard rape crime crime
Pune marketyard rape crime crime

Pune marketyard rape News : पुण्यात रक्षकच भक्षक निघल्याची घटना उघडकीस आली आहे. एक महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

उपनिरीक्षक युवराज वामन शिंदे, तसेच त्याची पत्नी काजल असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पिडीतीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती. त्यामुळे उपनिरीक्षकाच्या पत्नीविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला.

Bilkis Bano Case : सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालावर बिल्किस बानोची प्रतिक्रिया, म्हणाल्या..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची उपनिरीक्षक शिंदे याच्याशी कोणत्या तरी कार्यक्रमात ओळख झाली होती. दरम्यान, शिंदे याने महिलेशी जवळीक वाढवली. यानंतर त्याने विवाहातेला लग्नाचे आमिष दाखवून तिला सातारा रस्त्यावर एका हॉटेलमध्ये नेले. या ठिकाणी त्याने तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर तिचा विश्वास संपादन करून तिच्याकडून वेळोवेळी महागड्या भेटवस्तू घेतल्या.

ट्रेंडिंग न्यूज

यानंतर, महिलेने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर शिंदेने तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडले. या बाबत पीडित महिला जाब विचारण्यासाठी थेट त्याच्या घरी गेली. यावेळी निरीक्षकाच्या पत्नीने, पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडित महिलेले मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा स्वारगेट पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपास सुरू आहे. स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर पुढील तपास करत आहेत.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर