IAS Probationer Pooja Khedkar mother viral video: पुण्यातील ट्रेनी आयएसअधिकारी पूजा खेडकर यांच्या सोबत आता त्यांच्या कुटुंबियांचे कारनामे देखील उघडकीस येत आहेत. पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्या मुळशी तालुक्यातील एका शेतकऱ्याला हातात पिस्तूल घेऊन दमदाटी करतांना दिसत आहे. या व्हिडिओची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून आई मनोराम खेडकर व वडील दिलीप खेडकर यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत देखील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रेनी असतांनाही आलीशान गाडीवर अंबर दिवा आणि जिल्हाधिकारी होण्यापूर्वी रुबाब करत वरिष्ठ अधिकाऱ्याची केबिन बळकवणाऱ्या आयएएस पूजा यांचे अनेक कारनामे उघड होत असतांना आता त्यांच्या कुटुंबीयांच्या देखली अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांचा शुक्रवारी एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हीडिओत मनोरमा खेडकर या त्या मुळशी तालुक्यातील एका शेतकऱ्याला हातात पिस्तूल घेऊन दमदाटी करतांना दिसल्या. तसेच महिला बाऊन्सर सोबत घेऊन शेतकऱ्याला मारहाण देखील त्यांनी केली. हा प्रकार घडला तेव्हा पिडीत शेतकऱ्याने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांवर दबाव आणल्याने त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. मनोरमा यांचा हातात पिस्तूल घेऊन दमदाटी करण्याचा व्हिडिओ पुढे आल्यावर स्थानिक शेतकऱ्याच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री उशिरा पौड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
मनोराम खेडकर यांनी आपल्याला धमकावले असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. त्यानुसार आयपीसीच्या कलम ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शस्त्रास्त्र कायद्यांतर्गतही डोंघावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी ही माहिती दिली आहे.
पूजा खेडकरच्या आईचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये ती हातात बंदूक घेऊन शेतकऱ्यांवर बंदूक ताणून त्यांना धमकावत आहेत. हा व्हिडिओ जुना आहे. टु आता व्हायरल झाला आहे. ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची नुकतीच पुण्याहून वाशीम येथे बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या प्रमाण पत्राची देखील चौकशी करण्यात येण्यासाठी समिति गठित करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूजाचे वडील हे सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. वडील दिलीप खेडकर यांच्यावर कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केल्याचा आरोप केला जात आहे. याशिवाय त्यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात २५ एकरसह अनेक ठिकाणी जमीन आहे. या कुटुंबाने जवळपासच्या शेतकऱ्यांची जमीनही हडप करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याला शेतकऱ्यांनी विरोध केला असता मनोरमा खेडकर यांनी त्यांच्या सुरक्षा रक्षकांसह जात शेतकऱ्यांना धमकावले.
संबंधित बातम्या