शिव्या दिल्या तर भरावा लागणार ५०० रुपयांचा दंड! महाराष्ट्रातील 'या' गावाने घेतला अनोखा निर्णय
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिव्या दिल्या तर भरावा लागणार ५०० रुपयांचा दंड! महाराष्ट्रातील 'या' गावाने घेतला अनोखा निर्णय

शिव्या दिल्या तर भरावा लागणार ५०० रुपयांचा दंड! महाराष्ट्रातील 'या' गावाने घेतला अनोखा निर्णय

Dec 02, 2024 10:44 AM IST

saundala grampanchayat news : सौंदाळा ग्रामपंच्यातीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. गावात बालकामगार व शिव्या देण्यास बंदी घातली आहे.

शिव्या दिल्या तर भरावा लागणार ५०० रुपयांचा दंड! महाराष्ट्रातील 'या' गावाने घेतला अनोखा निर्णय
शिव्या दिल्या तर भरावा लागणार ५०० रुपयांचा दंड! महाराष्ट्रातील 'या' गावाने घेतला अनोखा निर्णय

saundala grampanchayat news : अहमदनगर जिल्ह्यातील सौंदाळा (ता. नेवासा) ग्रामस्थांनी एक महत्वाचा ठराव केला आहे. गावात शिवीगाळ करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जो शिव्या देईल त्याला थेट ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. या सोबतच गावात बालकामगार ठेवण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. गावातील या अनोख्या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केलं आहे.

सौंदाळा येथे गुरुवारी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत गावाच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहे. गावातील महिला व पुरुषांनी गावात यापुढे एकमेकांना शिव्या द्यायच्या नाहीत. आई व बहिणीचा कुठलाही दोष नसताना त्यांच्या नावाने शिवीगाळ करून घाणेरडे शब्द वापरून स्त्री देहाचा अपमान करणाऱ्यांना त्यांचे आई, बहिणी, मुली आठवले पाहिजे, असा ठराव ग्रामस्थांनी केला आहे. जर शिव्या दिल्या तर शिव्या देणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे, अशी माहिती सरपंच शरद आरगडे यांनी दिली. या निर्णयातून आम्ही महिलांचा सन्मान केला आहे. असे देखील सरपंच शरद आरगडे यांनी मांडली. हा ठराव सादर करण्यात आल्यावर गणेश आरगडे यांनी त्याला अनुमोदन दिले. या ठरवा सोबत गावात बाल कामगा ठेवायचे नाहीत असा देखील ठराव संमत करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना मोबाइल मिळणार नाही

या निर्णय सोबतच आणखी एक महत्वाचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. सध्या मोबाइलच्या आहारी अनेक मुळे गेली आहेत. सोशल मीडिया, मोबाइलच्या व्यसणामुळे मुले अभ्यास करत नाहीत. त्यामुळे संध्याकाळी ७ ते ९ यावेळेत घरातील मुलांना मोबाईल द्यायचा नाही, असाही ठराव देखील ग्रामसभेत घेण्यात आला आहे.

गाव बालकामगार मुक्त करण्यासाठी बालकामगार दाखवा एक हजार रुपये मिळवा अशी घोषणा देखील या ग्रामसभेत करणीय आली आहे. कुणाला बालकामगार आढळल्यास त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतीला द्यावा. त्या व्यक्तीस १ हजार रुपये बक्षीस दिले जाईल असे देखील ठरवण्यात आले. या सोबतच गावात बालविवाहावर देखील बंदी घालण्याचा ठराव देखील करण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर