फायलींवर 'वजन' असलं की त्या जोरात पळतात…; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी परखड बोलून गेले!-file movement linked to weight of money says nitin gadkari in pune ceop ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  फायलींवर 'वजन' असलं की त्या जोरात पळतात…; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी परखड बोलून गेले!

फायलींवर 'वजन' असलं की त्या जोरात पळतात…; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी परखड बोलून गेले!

Sep 16, 2024 03:53 PM IST

Nitin gadkari on corruption : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सरकारी व्यवस्थेतील कथित भ्रष्ट पद्धतींवर टीका केली आणि सांगितले की, सरकारी यंत्रणेतील फायली या त्यावर टाकलेल्या वजनाच्या प्रमाणात (पैशाच्या) वेगाने पुढे पळतात.

'फायलींवर 'वजन' असलं की त्या जोरात पळतात...' मोदी कॅबिनेटमधील मंत्री स्पष्टच बोलले
'फायलींवर 'वजन' असलं की त्या जोरात पळतात...' मोदी कॅबिनेटमधील मंत्री स्पष्टच बोलले

Nitin Gadkari on corruption : ''आमच्याकडे न्युटनचे बाप आहेत, जेवढं वजन टाकाल तेवढीच फाईल वेगाने पळेल,'' असे व्यक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर टीका केली. अधिकाऱ्यांचं फाईलप्रेम लईच अवघड असतंय. हलतच नाहीत, फाईलवरून बसून राहतात, असं म्हणत गडकरींनी इंजिनिअर अधिकाऱ्यांना टोले देखील लगावले.

पुण्यात सीईओपी या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी गडकरी यांनी त्यांच्या वैदर्भीयन शैलीत आजच्या व्यवस्थेवर टीका केली. गडकरी म्हणाले, डीपीआर हेच रस्ते अपघाताच्या समस्येचं मूळ करण आहे आहे. कारण डीपीआरमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असतात. हे अभियंते लोक चुकीचा डीपीआर तयार करतात आणि त्यामुळे बिचाऱ्या प्रवाशांना रोड अपघातात आपला जीव गमवावा लागतो.

माझ स्वप्न राहिलं अपूर्ण; गडकरी

गडकरी म्हणाले, मला इंजिनियर व्हायचं होतं. पण, मला १२ वीत फक्त ५२ टक्के होते. त्यामुळे इंजिनिअरिंगला पात्र झालो नाही. त्यामुळे माजी इंजिनियर व्हायची इच्छा अपुरी राहिली.

तो पर्यंत भारतात ड्रायव्हर लेस कारला नो एन्ट्री

गडकरी पुढे म्हणाले, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ड्रायव्हर लेस कारला भारतात एण्ट्री देणार नाही, कारण देशातील २२ लाख ड्रायव्हर या निर्णयामुळे बेरोजगार होतील. गडकरी पुढे म्हणाले, इंजिनिअर्स हे नेहमी निर्माण कार्य करतात, नव्याच्या नेहमी शोधात असतात. ते देशाच्या विकासाला हातभार लावतात. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जगात अमेरिका एक नंबर, चीन दोन आणि भारत तीन नंबर असा क्रम लागतो. पूर्वी आपण सातव्या क्रमांकावर होतो.

मात्र, आता आपण यात मोठी प्रगती केली आहे. भारतातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री सर्वाधिक जीएसटी देणारा उद्योग आहे. यामध्ये साडेचार कोटी लोकांना रोजगार पुरवला असूनमी सर्व ऑटोमोबाईल इंडस्ट्रीच्या मालकांना बोलावून विनंती केली की, आगामी पाच वर्षाच्या काळात या इंडस्ट्रीचा विस्तार ५५ लाख कोटींचा करा, असं गडकरी म्हणाले.

Whats_app_banner
विभाग