Bhivandi Crime : बिर्याणी अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. त्यात चिकन बिर्याणी म्हटले की विचारायला नको. चांगल्या दर्जाची बिर्याणी खाण्यासाठी खवय्ये जंग जंग पछाडत असतात. मात्र, हीच बिर्याणी भिवंडी येथील कोनगाव येथे वादाचे करण ठरली. एका ग्राहकाच्या जेवणात बिर्याणीत चिकनचा तुकडा कमी आल्याच्या कारणावरून ग्राहकाने हॉटेल मालकाला जाब विचारल्याने हॉटेल मालकाने ग्राहकाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी येथील कोनगाव येथे शिवसेना चौकात महमदचा ख्वाजा गरीब नवाज नावाने बिर्याणीचे दुकान आहे. या ठिकाणी अनेक जण बिर्याणी खाण्यासाठी येत असतात. राहुल भदाणे नामक एक व्यक्ति हा या बिर्याणीच्या दुकानात गेला होता. त्याने येथून चिकन बिर्याणी खरेदी केली. मात्र, बिर्याणीत चिकनचे कमी तुकडे असल्याचे राहुल भदाणेच्या लक्षात आले. या बाबत त्याने हॉटेलमालकाला जाब विचारला तसेच चिकनचे पीस जादा टाकण्याची मागणी केली. मात्र, ही बाब हॉटेल मालकाला रुचली नाही. भदाणे यांनी केलेल्या मागणीचा हॉटेल मालकाला राग आला. या रागातून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
हा वाद टोकाला गेल्याने हॉटेल मालक व त्याच्या काही सहऱ्यांनी राहुल भदाणे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात राहुल भदाणे हे गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात दुकानदारावर गुन्हा दाखल आहे. कोनगाव येथील शिवसेना चौकात महमदचा ख्वाजा गरीब नवाज नावाने बिर्याणी विक्रीचे दुकान आहे. या दुकानातून राहुल भदाने याने बिर्याणी खरेदी केली होती. त्यानंतर हा वाद झाला.
नागपूरचे येथील पुरुषोत्तम पुट्टेवार (वय ८२) यांच्या अपघाताप्रकरणी त्यांची सून अर्चना पुट्टेवारच ही मास्टरमाइंड असल्याचे तपसात पुढे आले आहे. अर्चना हिने पुरुषोत्तम यांच्या हत्येची सुपारी तिचा ड्रायव्हर सार्थक बागडे याच्या माध्यमातून दिली होती. सार्थक बागडेने नीरज नीमजे व सचिन धार्मिक या दोघांना पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघात करून त्यांची हत्या करण्यास सांगितले होते. या प्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.