मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Darga Road Parbhani : परभणीत तरुणांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी; धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Parbhani Crime News Today Live
Parbhani Crime News Today Live (HT)

Darga Road Parbhani : परभणीत तरुणांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी; धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

07 January 2023, 9:26 ISTAtik Sikandar Shaikh

Parbhani Crime News : किरकोळ कारणावरून परभणीत तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सध्यो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळं शहरात खळबळ उडाली असून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Parbhani Crime News Today Live : किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परभणी शहरातील दर्गा रोडवर तरुणांच्या दोन गटात हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं खळबळ उडाली असून या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच परभणीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता तरुणांमध्ये मारामारी झाल्याची घटना घडल्यानं शहरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, परभणीतील दर्गा रोड परिसरातील सुंदर कॉम्प्लेक्समध्ये काही तरुणांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. परंतु तरुणांनी एकमेकांना शिवीगाळ केल्यामुळं प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचलं. त्यानंतर दर्गा रोडवर तरुणांचे दोन गट आमने-सामने आले आणि मारामारी सुरू झाली. नेमकं कोण कुणाला मारतंय हे समजत नसताना अनेकांनी भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

परभणीतील दर्गा रोड परिसरातील सुंदर कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या हाणामारीच्या प्रकरणात शहर पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळं आता या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करत परिसरात पोलीस चौकी उभारण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

विभाग