Viral News : बुलढाण्यात गर्भवतीच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ; सोनोग्राफी करताच डॉक्टरही झाले अचंबित
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral News : बुलढाण्यात गर्भवतीच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ; सोनोग्राफी करताच डॉक्टरही झाले अचंबित

Viral News : बुलढाण्यात गर्भवतीच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ; सोनोग्राफी करताच डॉक्टरही झाले अचंबित

Jan 31, 2025 03:41 AM IST

Buldhana Viral News : बुलढाण्यात एका गर्भवती महिलेची सोनोग्राफी करण्यात आली तेव्हा डॉक्टरांना मोठा धक्का बसला. महिलेच्या गर्भात वाढणाऱ्या गर्भाच्या पोटात देखील एक बाळ वाढत होते.

बुलढाण्यात गर्भवतीच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ; सोनोग्राफी करताच डॉक्टरही झाले अचंबित
बुलढाण्यात गर्भवतीच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ; सोनोग्राफी करताच डॉक्टरही झाले अचंबित (AP)

Buldhana Viral News : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि  विचित्र घटना समोर आली आहे. गर्भवतीच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ वाढत असल्याचे सोनोग्राफीमध्ये स्पष्ट झालं आहे. या प्रकारामुळं डॉक्टरांना देखील मोठा धक्का बसला आहे. ही घटना दुर्मिळ असल्याचं  डॉक्टरांनी म्हटलं आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी एक गर्भवती महिला ही  सोनोग्राफी करण्यासाठी आली होती. तिची सोनोग्राफी केल्यावर ही घटना उघकडीस आली.  

बुलढाण्यातील शासकीय रुग्णालयात महिलेची अल्ट्रासोनोग्राफी करण्यात आली. यावेळी तिची सोनोग्राफी पाहून डॉक्टरांना मोठा धक्का बसला. महिलेच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या पोटात देखील आणखी एक बाळ वाढत असल्याचं डॉक्टरांना दिसलं.  ही विलक्षण घटना पाहून  स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी पुन्हा तपासणी करून घेतली, पण दुसऱ्या सोनोग्राफीत देखील हेच दिसून आलं.  

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या दुर्मिळ वैद्यकीय स्थितीचे नाव 'फिटस इन फिटू' असे आहे, जे आतापर्यंत जगात केवळ २०० वेळा नोंदवली गेली आहे.  भारतातही अशा प्रकारची केवळ १५ ते २० प्रकरणं  समोर आली आहेत.

ही बाब लक्षात येताच महिलेला तात्काळ संभाजीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्या प्रसूतीसाठी डॉक्टरांचे पथक सज्ज झाले आहे. तथापि, तज्ञांचे म्हणणे आहे की या अवस्थेपासून महिलेला कोणताही मोठा धोका नाही, परंतु नवजात अर्भकाला जन्मानंतर लगेचच शस्त्रक्रियेची आवश्यकता असू शकते. ही महिला जिल्ह्याच्या घाटाखालील भागातील आहे तिला दोन अपत्य आहेत. महिलेला संभाजी नगर येथे पुढील उप चारसाठी पाठवण्यात आले असून तिथे तज्ज्ञांच्या देखेंरखीत ठेवण्यात आले आहे.

‘फीटस इन फीटू’ म्हणजे काय?

 मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला ‘फीटस इन फीटू’ असं म्हटलं जातं. अर्भकांमध्ये अर्भक असणं अशी ही घटना आहे. अशा केसमंध्ये एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असतं. साधारण पणे ५  लाख गर्भवती महिलांमध्ये असे एखादे प्रकरण  आढळते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टारांनी दिली.  यापूर्वी १९८३ मध्ये अशी पहिली घटना उघडकीस आली होती. जेव्हा गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यात दुसर्या गर्भाच्या आत जुळ्या गर्भाचा विकास होऊ लागतो तेव्हा ही स्थिती उद्भवते. ही एक अत्यंत दुर्मिळ स्थिती आहे आणि सामान्यत: गर्भाच्या विकासावर परिणाम करू शकते, असे देखील डॉक्टर म्हणाले.  

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर