दगाफटका टाळण्यासाठी मविआची बांधबंदिस्ती! काँग्रेसकडून विशेष विमान सज्ज; निवडून आलेल्या आमदारांना राज्याबाहेर हलवणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दगाफटका टाळण्यासाठी मविआची बांधबंदिस्ती! काँग्रेसकडून विशेष विमान सज्ज; निवडून आलेल्या आमदारांना राज्याबाहेर हलवणार

दगाफटका टाळण्यासाठी मविआची बांधबंदिस्ती! काँग्रेसकडून विशेष विमान सज्ज; निवडून आलेल्या आमदारांना राज्याबाहेर हलवणार

Nov 22, 2024 12:17 PM IST

Maharashtra Vidhansabha Election : राज्यात विधानसभा निवडणुकीचा उद्या शनिवारी निकाल लागणार आहे. दोन्ही आघाड्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे नेते अलर्ट असून दगा फटका टाळण्यासाठी आमदारांना राज्याबाहेर हलवण्यासाठी स्पेशल व्यवस्था करण्यात आली आहे.

दगाफटका टाळण्यासाठी मविआ अलर्ट! काँग्रेसकडून आमदारांसाठी विशेष विमान सज्ज; निवडून आलेल्या आमदारांना राज्याबाहेर हलवणार
दगाफटका टाळण्यासाठी मविआ अलर्ट! काँग्रेसकडून आमदारांसाठी विशेष विमान सज्ज; निवडून आलेल्या आमदारांना राज्याबाहेर हलवणार (Jitendra Takale)

Maharashtra Vidhansabha Election : राज्यात विधानसभा निवडणुकीचे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे. उद्या मतमोजणी असून १२ पर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. मतदान वाढल्याने महाविकास आघाडी व महायुती या दोघांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी गेल्या वेळेचा दगाफटका लक्षात ठेवून आहे. त्यामुळे आमदार फुटीच्या भीतीने मविआचे नेते अलर्ट मोडवर आहे. निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होताच विजयी आमदारांना राज्याबाहेर हलवण्याची तयारी करण्यात आली आहे. काँग्रेसने यासाठी विदर्भातील आमदारांसाठी विशेष विमानाची व्यवस्था देखील केल्याची माहिती आहे.

उद्या २३ नोव्हेंबरला विधानसभेचे निकाल समोर येणार आहे. महाविकास आघाडीला विजयाचा विश्वास आहे. एक्झिट पोलमध्ये चुरशीची लढत होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आमदार फुटीच्या भीतीने बिघाड होऊ शकतो, असे सर्वच पक्षांना वाटू लागले आहे. त्यामुळे महायुतीपासून महाविकास आघाडीपर्यंत सर्वच पक्षातील नेते सतर्क झाले आहेत. एकीकडे भाजपने आपल्या आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहे. तर तर महाविकास आघाडीचे नेतेही सतर्क आहेत. आमदारांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी खास विमानाची व्यवस्था करण्यात आहे. जे आमदार निवडून येण्याची शक्यता आहे त्यांना राज्याबाहेर नेण्याची तयारी करण्यात आली आहे. विदर्भातील कॉँग्रेसनेत्यांना बाहेर नेण्याची जबाबदारी वडेट्टीवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

गुरुवारी संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी-सपाचे जयंत पाटील यांच्यात बैठक झाली. निवडणुकीत त्रिशंकु चित्र निर्माण झाले तर भाजप आणि एकनाथ शिंदे इतर पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी चर्चा आहे. हे टाळण्यासाठी आमदारांना आधीच राज्याबाहेर पाठवावे या तयारीत महाविकास आघाडीचे नेते आहेत. बहुतांश आमदारांना कर्नाटक आणि तेलंगणा सारख्या काँग्रेसशासित राज्यांमध्ये पाठवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शनिवारी सायंकाळपर्यंत या आमदारांना बाहेर पाठविण्यात येणार आहे. निकाल स्पष्ट झाल्यावर काही वेळातच सर्व आमदारांना राज्याबाहेर पाठवलं जाणार आहे.

जेव्हा सरकार स्थापनेचा दावा केला जाईल तेव्हा या नेत्यांना पुन्हा मुंबईत आणले जाणार आहे. मुंबईत देखील हॉटेल बूक करून ठेवण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून दोन्ही आघाड्या अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात आता मोठ्या राजकीय नाट्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्व आमदारांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

या आमदारांना कुठे पाठवले जाणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांना तेलंगणा किंवा कर्नाटकात ठेवण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ऐवढेच नाही तर हॉटेलची व्यवस्था करण्यात आली आहे. निकाल येईपर्यंत सर्व जण वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.

Whats_app_banner