Pune FDA Action on toni da dhaba : पुण्यात हॉटेलमध्ये खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लाखो पुणेकर विविध हॉटेलमध्ये अक्षरशा: रांगा लावून जेवणासाठी थांबत असतात. मात्र, आता हॉटेलमध्ये खण्यापूर्वी त्या हॉटेलमधील पदार्थ हे शुद्ध वस्तूंपासून बनले की नाही हे तपासून पाहवे लागणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत ही बाब उघड झाली आहे. पुण्यातील पाषाण येथील टोनी दा ढाबा यहेतहे कारवाई करत तब्बल ४७ लाख ४७ लाख २२ हजार ३०० रुपयांचा प्रतिबंधित साठा व एक वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.
औषध प्रशासनाच्या मंत्रालयीन कार्यालयातून प्राप्त गोपनीय माहितीच्या अनुषंगाने ही मोहीम राबविण्यात आली. या मोहमेअंतर्गत १ वाहन जप्त करण्यात आले असून चतुःशृंगी पोलिस स्टेशनमध्ये वाहनचालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आयला आहे.
जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातुन राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखु, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखु जन्य पदर्थावर उत्पादक साठा, वितरण, वाहतुक तसेच विक्री यावर १ वर्षाकरीता बंदी घातलेली आहे.
काही दिवसांपूर्वी तुपाचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या छुप्या कारखान्यावर देखील मोठी कारवाई करनेत आली आहे. यात बनावट तूप जप्त करण्यात आले आहे. तर बनावट पनीर निर्मितीच्या कारखान्यावर देखील कारवाई करण्यात आली असून हजारो किलो बनावट पनीर जप्त करण्यात आले आहे.
प्रतिबंधीत गुटखा, पान मसाला इत्यादीच्या विक्री बाबतची माहिती असल्यास जागरुक नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधण्याचे आवाहंन पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) अ. गो. भुजबळ यांनी केले आहे.