परदेशी निधी घेणाऱ्या NGO सरकारच्या रडारवर! गृहमंत्रालय मोठी कारवाई करण्याच्या तयारीत
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  परदेशी निधी घेणाऱ्या NGO सरकारच्या रडारवर! गृहमंत्रालय मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

परदेशी निधी घेणाऱ्या NGO सरकारच्या रडारवर! गृहमंत्रालय मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

Nov 12, 2024 09:27 AM IST

Home Meinistry will take action on NGO : मंत्रालयाने म्हटलं आहे की, जर एखादी स्वयंसेवी संस्था आपल्या उद्दिष्टे आणि धोरणानुसार परदेशी निधीचा वापर करण्यात अपयशी ठरली किंवा वार्षिक विवरणपत्र दाखल केली नाही तर त्याची एफसीआरए नोंदणी रद्द केली जाईल.

सरकारच्या रडावर परदेशी निधी घेणाऱ्या NGO! गृहमंत्रालय लवकरच मोठी कारवाई करण्याची शक्यता; काय आहे प्रकरण ?
सरकारच्या रडावर परदेशी निधी घेणाऱ्या NGO! गृहमंत्रालय लवकरच मोठी कारवाई करण्याची शक्यता; काय आहे प्रकरण ?

Home Meinistry will take action on NGO : परदेशी निधीचा वापर कणाऱ्या स्वयंमसेवी संस्थावर केंद्रीय मंत्रालय मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. देशातील विकास प्रकल्पा विरोधातील भूमिका,  धर्मांतर किंवा द्वेषपूर्ण हेतूने निदर्शने, चिथावणी देणाऱ्या किंवा दहशतवादी किंवा कट्टरपंथी गटांशी संबंध असलेल्या कोणत्याही स्वयंसेवी संस्थेचा एफसीआरए परवाना रद्द करण्यातची  घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे.

गृह मंत्रालयाने सोमवारी आपल्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केलेल्या नोटीशीमध्ये म्हटले आह की, ज्या स्वयंसेवी संस्थांनी परदेशी निधी स्वीकारल्याने सामाजिक सामाजिक सलोख्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो किंवा या निधीचा वापर प्रेरित किंवा बळजबरीने धर्मांतर करण्यासाठी केला जात असेल अशा संस्थांची परदेशी योगदान (नियमन) अधिनियम (एफसीआरए), २०१० अंतर्गत नोंदणी रद्द केली जाईल.

मंत्रालयाने म्हटले आहे की, जर एखादी स्वयंसेवी संस्था आपली उद्दिष्टे आणि उद्दिष्टांनुसार परदेशी निधीचा  वापर करण्यात अपयशी ठरली असेल किंवा वार्षिक विवरणपत्र सादर केली नसेल तर अशा संस्थांची देखील  एफसीआरए नोंदणी रद्द केली जाईल. कायद्यानुसार परदेशी निधी मिळण्यासाठी स्वयंसेवी संस्थेची परदेशी योगदान (नियमन) कायद्यांतर्गत नोंदणी करणे बंधनकारक आहे.

गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, एखाद्या स्वयंसेवी संस्थेने गेल्या दोन-तीन वर्षांत सहभाग घेतला नसेल किंवा निष्क्रिय झाला नसेल किंवा संस्थेच्या कल्याणासाठी केलेल्या कामांची खातरजमा केली जात नसेल तर त्याची एफसीआरए नोंदणी देखील रद्द केली जाऊ शकते.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एफसीआरए परवाना रद्द करण्याच्या इतर कारणांमध्ये कोणत्याही पदाधिकारी, सदस्य किंवा प्रमुख पदाधिकाऱ्याविरुद्ध विचारण्यात आलेल्या स्पष्टीकरणाला प्रतिसाद न दिल्याबद्दल किंवा संधी देऊनही आवश्यक माहिती किंवा कागदपत्रे सादर न केल्याबद्दल खटला प्रलंबित आहे, अशा संस्थांचा देशील एफसीआरए परवाना रद्द केला जाऊ शकतो.

जर एखाद्या स्वयंसेवी संस्थेने परदेशी निधीचा वापर विकासविरोधी कारवाया करण्यासाठी किंवा द्वेषपूर्ण हेतूने आंदोलने  भडकवण्यासाठी केला असेल किंवा क्षेत्रीय तपासणीत संस्थेला किंवा त्याच्या पदाधिकाऱ्यांना लाभ मिळाला असेल किंवा परकीय देणगी ही चुकीच्या कामासाठी  वापरली गेल्याचे दिसून आले असेल तेव्हा अशी कारवाई केली जाऊ शकते,  असे नोटीसमध्ये म्हटले आहे. दहशतवादी संघटना किंवा देशविरोधी घटकांशी संबंध असल्याच्या बाबतीत त्यांची एफसीआरए नोंदणी रद्द केली जाईल, असे देखील या नोटीसीत म्हटले आहे. 

कोणत्याही तपास यंत्रणेने कोणत्याही स्वयंसेवी संस्थेचा पूर्वग्रहदूषित कारवायांमध्ये सहभाग असल्याची माहिती दिल्यास किंवा मिळालेल्या परकीय निधीमुळे सामाजिक, धार्मिक सलोख्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केल्यास त्याचा एफसीआरए परवानाही रद्द करण्यात येईल, असे या नोटिशीत म्हटले आहे.

स्वयंसेवी संस्थेने प्रकल्पांसाठी प्राप्त झालेल्या परकीय निधीचा वापर आपल्या उद्दिष्टांनुसार न करणे, गेल्या सहा आर्थिक वर्षांपैकी एकाही आर्थिक वर्षाचा वार्षिक परतावा अपलोड न करणे आणि समाजाच्या कल्याणासाठी गेल्या तीन आर्थिक वर्षांत आपल्या मुख्य उपक्रमांसाठी किमान १५ लाख रुपये खर्च करण्याचे निकष पूर्ण न केल्याने एफसीआरए परवाना रद्द केला जाऊ शकतो. 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर