Jalna Crime news : बाप आणि मुलाचे नाते हे अतूट असतं. मात्र, या नात्याला जालना येथे एकाने काळिमा फसली आहे. दारू पिण्यासाठी मुलाला भीक मागायला लावण्याचा प्रकार पुढे आला असून या साठी मुलाला चटके देखील देण्यात आले. या घटनेत मुलगा हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात भरती केले आहे. सध्या मुलावर उपचार सुरू असून त्यांची स्थिती ही चिंताजनक आहे. जालन्यातील मंगळबाजार परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून मद्यपी बापाला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी देखील केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या जालन्यात मंगळवारबाजार पेठेत राहणाऱ्या एका मद्यपी बापाने त्याच्या ७ वर्षाच्या मुलाला दारूसाठी भिक मागून पैसे आणावे यासाठी मारहाण केली. मात्र, त्याने नकार दिल्याने त्याला उलथण्याने चटके दिले. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने स्थानिकांनी याची माहिती ही चाईल्ड हेल्पलाईनच्या अधिकाऱ्यांना दिली. या नंतर अधिकारी हे आरोपी बापाच्या घरी गेले. त्यांनी मुलाची मद्यपी बापाच्या तावडीतून सुटका केली आहे. दरम्यान, याची माहिती ही सदर बाजार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. बालकल्याण समितीला पत्रव्यवहार करून तक्रार देखील देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.
कात्रज-कोंढव्या रस्ता परिसरात रुंदीकरण, तसेच समतल विलगकाच्या (ग्रेड सेपरेटरच्या) कामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ठेकेदाराविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जगदीश छगन शिलावत (वय ३५, रा. केसर लॉजमागे, महाकाली मंदिराजवळील मोकळ्या जागेत, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुण्यात गेल्या दोन दिवसांनपासून जोरदार पाऊस होता. या पावसाने पुणेकरांची वाताहत झाली होती. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने पालिकेचा भोंगळ कारभार पुढे आला.