Pune Crime News : जगात आज ‘फादर्स डे’ साजरा केला जात आहे. मात्र, या दिवशी पुण्यात मात्र, बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. चार वर्षाच्या मुलीला चाकूने चटके देत तिच्यावर अत्याचार करण्यात आले आहे. मुलगी शाळेत रडत असल्याने तिचे समुपदेश केल्यावर ही घटना उघकडीस आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी आरोपी नराधम बापाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
सुनील चौहान असे अटक केलेल्या आरोपीचे बापचे नाव आहे. ही घटना ५ ते १४ जून दरम्यान घडली आहे. आज ‘फादर्स डे’ साजरा केला जात आहे. अनेक जण आपल्या वडिलांना आदर्श मानत वडिलांप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा करत असतात. मात्र, पुण्यात घडलेल्या या घटनेमुळे चीड व्यक्त होत आहे. जन्मदात्या बापाने चार वर्षांच्या मुलीला चाकूने चटके दिले. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही शाळेत आल्यावर सारखी रडत असे. दरम्यान शिक्षिका गेल्या काही दिवसांपासून मुलीला पाहत होती. शिक्षिकेने प्रेमाने मुलीला जवळ घेतले. यावेळी तिच्या हातावर चटके दिल्याचे व्रण दिसले. मुलीला प्रेमाने या बद्दल शिक्षिकेने विचारल्यावर मुलीने तिच्यावर बेतलेला प्रसंग कथन केला. तिच्या उत्तरामुळे शिक्षिका देखील हादरली.
आरोपी हा मुलीचा सावत्र बाप होता. मुलीची आई व बाप हे दोघेही मजुरीची कामे करतात. दरम्यान, आईला हा प्रकार माहिती होता. मात्र, तिने सुरवातीला या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. मात्र, सावत्र बाप हा मुलीचा खूप छळ करायला लागला. त्यामुळे आईने अखेर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपी सावत्र बापा विरोधात तक्रार दिली आहे.
आरोपी हा मुलीशी अश्लील वर्तन करत होता. त्याने तिचे लैंगिक सोक्षण केल्याचे देखील उघड झाले आहे. त्याने मुलीला अनेक वेळा त्याने चाकू गरम करून चटके देखील दिले. या प्रकारामुळे मुलगी ही दहशतीत आहे.
संबंधित बातम्या