मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Solapur murder : शाळेत मस्ती करतो म्हणून वैतागलेल्या बापाने कोल्ड्रिंक्समधून विष देऊन मुलाला संपवले!

Solapur murder : शाळेत मस्ती करतो म्हणून वैतागलेल्या बापाने कोल्ड्रिंक्समधून विष देऊन मुलाला संपवले!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 30, 2024 01:08 PM IST

Solapur murder : मुलगा शाळेत मस्ती करतो, खोडसाळपणा करतो म्हणून वैतागलेल्या बापाने त्याला कोल्ड्रिंक्समधून विषारी औषध पाजत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे उघडकीस आली आहे.

 murderd
murderd

father killed his son in Solapur : बाप आणि मुलाचं नातं काही वेगळचं असतं. मुलगा व्हावा या साठी अनेक जण प्रार्थना करत असतात. मात्र, सोलापूर येथे मन हेलावून सोडणारी एक घटना उघडकीस आली आहे. मुलगा शाळेत मस्ती आणि खोडसाळपणा करत असल्याच्या कारणामुळे पित्याने पोटच्या मुलाला विषारी औषध पाजून त्याला ठार मारल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल १५ दिवसांनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला असून आईने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.

भारतीय नौदलाची मोठी कामगिरी! समुद्री चाच्यांच्या तावडीतून केली १९ पाकिस्तानी नागरिकांसह इराणच्या जहाजाची सुटका

विजय सिद्राम बट्टू असे खूनी वडिलांचे नाव आहे. तर विशाल विजय बट्टू (वय १४) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी विशालच्या आईने पोलिसांत तक्रार दिली असून आरोपी विजला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल हा १५ दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. तो शाळेतून गेल्यावर घरी आला नव्हता. यामुळे आरोपी वडील विजय याने नतेवाईकांसोबत पोलिस ठाण्यात जाऊन विशाल हा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

दरम्यान, पोलिस विशालचा शोध घेत होते. मात्र, तो सापडला नव्हता. दरम्यान, जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर रात्री ११ वाजता पोलिसांना शहरातील तुळजापूर नाका येथे एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला दवाखान्यात नेले असता, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, बट्टू यांचा मुलगा बेपत्ता असल्याने पोलिसांनी हा मुलगा तोच आहे का म्हणून बट्टू यांना ओळख पटवण्यासाठी बोलावले. दरम्यान, नतेवाईकांनी मृतदेह पाहिला असता तो विशालचाच असल्याचे सांगितले. यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालात सोडियम नायट्रेट्चे सेवन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना समजले.

BKC Plot to ED : ईडीला मिळणार हक्काची जागा! मुंबई कार्यालयासाठी बीकेसीत तब्बल ३६२ कोटींंचा भूखंड

घटना घडल्याच्या जवळपास १५ दिवसांपासून आरोपी वडील हा पोलिसांसोबत मुलाच्या खून प्रकरणाची चौकशी करत होता. दरम्यान, तपासात पोलिसांचा संशय हा वडील विजय बट्टू यांच्याकडे जात होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याने पत्नीकडे त्याच्या हातातून मोठी चूक झाल्याचे बोलले होते. तेव्हा पत्नीला संशय आला नाही. मात्र, पोलिस तपासात संशय हा विजयवर आल्याने तिने थेट पोलिसांत पतीविरोधात तक्रार दिली. यानंतर त्याला अटक करण्यात आली. सुरवातीला विजय याने पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी त्याला हिसका दिल्यावर त्याने खून केल्याचे कबूल केले.

विजयला खून करण्याचे कारण विचारले असता पोलिसदेखील चक्रावले. माझ्याकडून खूप मोठी चूक झाल्याचे म्हणत विशालहा शाळेत मस्ती करत असे, अनेकांच्या खोड्या तो काढत होता. तसेच मोबाइलवर त्याने नको टया गोष्टी पहिल्याने वडील विजयचा राग अनावर झाला. यामुळे त्याने मुलाला मारण्याचे ठरवले. विशालला रागाच्या भरात त्याने थम्सअपमध्ये सोडियम नायट्रेट् हे विषारी औषध पाजले. यानंतर त्याला निर्जन स्थळी सोडून आरोपी विजय हा फरार झाला. पोलिसांनी विजय बट्टूवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालसमोर हजर केले. न्यायालयाने त्याला बुधवार पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

WhatsApp channel