मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur Murder: कोल्हापूर हादरलं.. चारित्र्याच्या संशयातून पत्नीसह दोन मुलांची गळा आवळून हत्या

Kolhapur Murder: कोल्हापूर हादरलं.. चारित्र्याच्या संशयातून पत्नीसह दोन मुलांची गळा आवळून हत्या

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 28, 2022 09:17 PM IST

कागलमध्ये चारित्र्याच्या संशयातून तिहेरी हत्याकांडाचा प्रकार समोर आला आहे.पत्नीची हत्या करून नराधम बापाने दोन मुलांचेही आयुष्य संपवून पोलीस ठाण्यात हजर झाला.

चारित्र्याच्या संशयातून पत्नीसह दोन मुलांची गळा आवळून हत्या
चारित्र्याच्या संशयातून पत्नीसह दोन मुलांची गळा आवळून हत्या

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. कोल्हापूर शहराच्या (Kolhapur Murder) जवळच्या गावात बापानेच पोटच्या मुलीवर बलात्कार करून गर्भवती केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कागलमध्ये चारित्र्याच्या संशयातून तिहेरी हत्याकांडाचा प्रकार समोर आला आहे. पत्नीची हत्या करून नराधम बापाने दोन मुलांचेही आयुष्य संपवून पोलीस ठाण्यात हजर झाला. नवरात्रीच्या काळात झालेल्या या तिहेरी हत्याकांडाने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे.

मी बायको व मुलांची हत्या केली असून मला अटक करा असे म्हणते आरोप पोलीस ठाण्यात हजर झाला. गायत्री प्रकाश माळी (वय ३०), कृष्णात माळी (१०) आणि आदिती माळी (१६) अशी मृतांची नावे असूनप्रकाश बाळासो माळी (३६) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी पूर्वी कागलमधील गणेशनगर भागात राहतो. प्रकाश पूर्वी होमगार्ड म्हणून काम करत होता. आता नोकरी सोडून कागल साखर कारखान्यात नोकरीला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी प्रकाश आणि पत्नी गायीत्री यांच्यात वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, प्रकाशने गायत्रीचा गळा आवळून खून केला व मृतदेह घरातच लपवून ठेवला. सायंकाळी पाच वाजता मुलगा कृष्णा शाळेतून घरी आला तेव्हा प्रकाश बाहेरच्या खोलीत बसला होता. कृष्णा आतील खोलीत गेल्यावर त्याला आई जमिनीवर पडलेली दिसली. त्याने आईला उठवण्याचा प्रयत्न केला;पण ती हलत नव्हती. आईसोबत आपल्या वडिलांनी काही तरी केले आहे,हे लक्षात आल्यावर कृष्णा जोरजोरात रडू लागला. त्यामुळे संतापलेल्या प्रकाशने कृष्णाचाही गळा आवळून खून केला.

कृष्णाचा मृतदेह त्याने त्याच खोलीत ठेवला आणि पुन्हा बाहेरच्या खोलीत येऊन बसला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुलगी आदिती घरी परतली. आतील खोलीत आई आणि भावाचा मृतदेह बघून तिने हंबरडा फोडला. प्रकाशने तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला. मात्र आदिती लोक गोळा करेल या भीतीने प्रकाशने तिलाही गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला;पण ती हिसडा मारून निसटली. त्यामुळे प्रकाशने स्वयंपाकघरातील वरवंटा तिच्या डोक्यात घातला. आदिती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्यावर पुन्हा प्रकाश बाहेरच्या खोलीत येऊन बसला. त्यानंतर त्याने पोलीस ठाणे गाठून आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या