मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Parbhani Crime : परभणी हादरले! मुलाने प्रेमविवाह केल्याने रागाच्या भरात बापाने पोटच्या मुलाला संपवले

Parbhani Crime : परभणी हादरले! मुलाने प्रेमविवाह केल्याने रागाच्या भरात बापाने पोटच्या मुलाला संपवले

Jun 11, 2024 08:13 AM IST

Parbhani Murder : परभणीच्या पिंपरी देशमुख गावात मुलाने प्रेमविवाह केल्याने रागाच्या भरात वडिलांनी मुलाचा खून केल्ययाने खळबळ उडाली आहे. आरोपी बाप आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे.

परभणीच्या पिंपरी देशमुख गावात मुलाने प्रेमविवाह केल्याने रागाच्या भरात वडिलांनी मुलाचा खून केल्ययाने खळबळ उडाली आहे. आरोपी बाप आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे.
परभणीच्या पिंपरी देशमुख गावात मुलाने प्रेमविवाह केल्याने रागाच्या भरात वडिलांनी मुलाचा खून केल्ययाने खळबळ उडाली आहे. आरोपी बाप आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे. (HT_PRINT)

Parbhani Murder : परभणीतील पिंपरी देशमुख येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने जातीतील मुलीशी लव्ह मॅरेज केल्याचा राग आल्याने संतापलेल्या बापाने व ट्याच्या भावाने पोटच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी बाप व मृत मुलाच्या भावाला अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गोविंद आवकाळे असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तर माधव आवकाळे असे आरोपी बापाचे नाव आहे तर व्यंकटेश आवकाळे असे आरोपी भावाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंदने स्वजातीतीलच एका तरुणीशी पुण्यात आळंदी येथे जावून प्रेम विवाह केला. दोन-ते अडीच महिन्यांपासून ते जोडपे पुण्यात राहत होते. दरम्यान, याचा राग गोविंदचे वडील माधव यांना होता.

Palghar Murder: घरच्यांच्या विरोधातून प्रियकर प्रेयसीत भांडण! रागाच्या भारत प्रियकराने प्रेयसीची केली हत्या

गोविंद याने प्रेमविवाह केला. यानंतर तो पुण्यात भाड्याने घर घेऊन राहत होता. यानंतर तो घरच्यांना त्रास देत होता. त्यामुळे वडील माधव आवकाळे यांनी गोविंद याला घरी बोलावून घेतले. रविवारी रात्री तो शेतात झोपला होता. यावेळी माधव आवकाळे व त्याचा दुसरा मुलगा व्यंकटेश आवकाळे याने झोपेत असलेल्या गोविंदवर धारदार शस्त्राने डोक्यावर, डोळ्यावर आणि मनगटावर वार केले. यात घाव वर्मी लागल्याने गोविंदचा जागीच मृत्यू झाला. यानंतर दोघेही बाप लेक फरार झाले.

Mohan Bhagwat : मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात; वाद प्राधान्याने सोडवा! सरसंघचालक मोहन भागवतांनी सरकारचे कान टोचले

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी हे घरातील असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी वडील माधव आवकाळे व भाऊ व्यंकटेश आवकाळे या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आप्पाराव वराडे यांनी तक्रार दिली असून त्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमाला विरोध करत आई-बापाने केला मुलीचा खून

परभणीत अशीच एक घटना उघडकीस आली होती. मुलीचे परजातीतील मुळाशी प्रेमसंबंध होते. याला घरच्यांचा विरोध होता. दरम्यान, मुलीने पळून जाऊन मुलासोबत लग्न केले. याचा राग आल्याने आईवडिलांनी पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केली होती. ही घटना परभणीच्या पालम तालुक्यात घडली होती. ही घटना ताजी असतांना पिंपळे देशमुख येथे ही बापाने पोटच्या मुलाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

 

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग