Latur father suicide news : लातूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीसाठी इडिली घेऊन जातो असे म्हणून एका वडिलांनी आपल्या मुलीचा गळा आवळून खून केला. यानंतर स्वत: देखील आत्महत्या केली. येथील मार्केट यार्ड लगत असलेल्या मोतीनगर भागात ही घटना बुधवारी घडली.
अभय लखन भुतडा (वय ३५) असे ६ वर्षीय मुलीचा खून करून आत्महत्या करणाऱ्या बापाचे नाव आहे. त्याने नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली या बाबत माहिती समजू शकली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भूतडा हे मोती नगर येथे राहतात. मार्केट यार्ड परिसरात त्याचे इडली गृह देखील आहे. मुलीसाठी इडली आणतो तसेच मुलीला शाळेत सोडतो असे सांगितले. दरम्यान अभय हा घराबाहेर पाडला. त्याने मुलीसाठी इडिली आणली. मात्र, त्याच्या मनात काय चालले याचा कुणालाही थांगपत्ता नव्हता. घरी येत त्याने मुलीचा गळा बेडशीटने आवळून तिला ठार केले. यानंतर स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली.
दरम्यान, पुण्यात देखील अशीच घटना मंगळवारी उघडकीस आली होती. पिंपरी-चिंचवड येथील थेरगाव येथे एका वडिलांनी आधी आपल्या ७ वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केली तर यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्मत्या केली. भाऊसाहेब बेदरे (वय ४३) असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे.
तर राज नंदिनी भाऊसाहेब बेदरे (वय ७) असे खून झालेल्या सात वर्षीय मुलीचे नाव आहे. वाकड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून घटनास्थळी त्यांना भाऊसाहेब यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेही चिठ्ठी आढळली. यात त्यांनी आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलत असल्याचे लिहिले आहे. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.