मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Porsche crash : पुणे पोर्शे प्रकरणी आरोपी मुलाच्या आजोबा व बिल्डर बापाला जामीन मंजूर; तरी राहावे लागणार तुरुंगात

Pune Porsche crash : पुणे पोर्शे प्रकरणी आरोपी मुलाच्या आजोबा व बिल्डर बापाला जामीन मंजूर; तरी राहावे लागणार तुरुंगात

Jul 03, 2024 06:10 AM IST

Pune Porsche crash : पुणे पोर्शे प्रकरणी आरोपी मुलाला मुंबई हायकोर्टाने नुकताच जामीन मंजूर केला आहे. आता आरोपी मुलाच्या वडिलांना व आजोबाला देखील या प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. पण, रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी विशाल अगरवाल याला कोठडीतच राहावे लागणार आहे.

पुणे पोर्शे प्रकरणी आरोपी मुलाच्या आजोबा व बिल्डर बापाला जामीन मंजूर;  तरी राहावे लागणार तुरुंगात
पुणे पोर्शे प्रकरणी आरोपी मुलाच्या आजोबा व बिल्डर बापाला जामीन मंजूर; तरी राहावे लागणार तुरुंगात

Pune Porsche crash : पुण्यातील पोर्शे कार दुर्घटने प्रकरणी हाय कोर्टाने नुकताच आरोपी मुलाला जामीन मंजूर केला आहे. आता पुणे न्यायल्याने आरोपीचे आजोबा आणि वडील बिल्डर विशाल अगरवाल यांना देखील जामीन मंजूर केला आहे. यामुळे या प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला आहे. ड्रायव्हरचे अपहरण करून चुकीच्या पद्धतीने बंदिस्त केल्या प्रकरणी दोघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, आणखी एका गुन्ह्यात कोठडीत असल्याने आरोपीचे वडील विशाल अगरवालचा यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे. तर आरोपी मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल यांची तुरुंगातून सुटका होणार आहे.

मुलाने केलेला गुन्हा स्वत:वर घेण्यासाठी ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला आजोबा सुरेन्द्र कुमार अगरवाल व वडील विशाल अगरवाल यांनी अपहरण करून डांबून ठेवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल होता. या सोबतच विशाल अगरवालने ससून मधीन डॉक्टरांशी मिळून संगनमत करून मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्या प्रकरणी वडील विशाल अगरवाल व आई शिवानी अगरवाल हिच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी दोघेही येरवडा कारागृहात आहेत. त्यामुळे दोघाही पतीपत्नीची अद्याप सुटका होणार नाही. पण, आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुणे पोलिस जाणार सर्वोच्च न्यायालयात

गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अल्पवयीन मुलाची बाल सुधार गृहातून सुटका करण्यात आली. तसेच त्याचा ताबा त्याच्या मावशीकडे सोपवण्यात आला. मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात पुणे पोलिस सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

पुण्यातील कल्याणी नगर येथे १९ मे रोजी पहाटे एका दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणाचा व एका तरुणीचा मृत्यू झाला होता. जुवेनाइल जस्टिस बोर्डाने (जेजेबी) त्याच दिवशी १७ वर्षीय मुलाला जामीन मंजूर करून त्याला त्याचे आई-वडील आणि आजोबांच्या देखरेखीखाली ठेवण्याचे आदेश दिले होते. तर रस्ता सुरक्षेवर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याचे आदेश दिले होते. मात्र, बोर्डाच्या या निर्णयामुळे नागरिकांचा संताप झाला. यामुळे जामीन आदेशात बदल करण्यात आला आणि अल्पवयीन मुलाला पुण्यातील निरीक्षण गृहात पाठवण्यात आले. अल्पवयीन मुलाची मावशी पूजा जैन हिने १४ जून रोजी न्यायालयात धाव घेऊन त्याची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली होती.

अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने अदलाबदल केल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलीच्या पालकांना अटक करण्यात आली होती. अल्पवयीन मुलीच्या आईने १ जून रोजी पुराव्याशी छेडछाड केल्याची कबुली दिली आणि सांगितले की, आरोपी मुलगा हा मद्यधुंद होता हे लपवण्यासाठी तिने त्याच्या रक्ताचे नमुने बदलले.

१९ मे रोजी पुण्यातील कल्याणी नगर चौकात भरधाव येणाऱ्या पोर्शे कारखाली चिरडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलासह त्याच्या आई-वडिलांसह आजोबांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अग्रवाल कुटुंबीयांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले असून सध्या अख्ख कुटुंब न्यायालयीन कोठडीत आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर