Pimri-Chinchwad Crime : आधी पोटच्या मुलीचा दोरीने आवळला गळा; नंतर स्वत: केली आत्महत्या, धक्कादायक घटनेने थेरगाव हादरले
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pimri-Chinchwad Crime : आधी पोटच्या मुलीचा दोरीने आवळला गळा; नंतर स्वत: केली आत्महत्या, धक्कादायक घटनेने थेरगाव हादरले

Pimri-Chinchwad Crime : आधी पोटच्या मुलीचा दोरीने आवळला गळा; नंतर स्वत: केली आत्महत्या, धक्कादायक घटनेने थेरगाव हादरले

Mar 20, 2024 03:29 AM IST

Pimri-Chinchwad murder : पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका वडिलांनी आपल्या मुलीची हत्या करून स्वत: आत्महत्या केली.

पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका वडिलांनी आपल्या मुलीची हत्या करून स्वत: आत्महत्या केली.
पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका वडिलांनी आपल्या मुलीची हत्या करून स्वत: आत्महत्या केली.

Pimri-Chinchwad murder : पिंपरी-चिंचवडच्या थेरगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने आपल्या सात वर्षीय मुलीचा दोरीने गळा आवळून स्वत: गळफास घेत आमहत्या केली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. आर्थिक विवंचनेतून वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. वाकड पोलिस पुढील तपास करत आहेत.

Raj Thackeray in Delhi : राज ठाकरे दिल्लीला रवाना; भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होणार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाऊसाहेब बेदरे (वय ४३) असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे. तर राज नंदिनी भाऊसाहेब बेदरे (वय ७) असे खून केलेल्या सात वर्षीय मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब हे पत्नी राजश्री सोबत थेरगाव येथे राहत होते. त्यांची पत्नी ही बाहेर गावी गेली होती. राजश्री या काल सकाळी गावावरून शिवाजीनगर बसस्थानक येथे आल्या. त्यांनी त्यांना घेऊन जाण्यासाठी पती भाऊसाहेब यांना फोन केला. यावेळी भाऊसाहेब हे घेण्यासाठी येतो म्हणाले. दरम्यान, राजश्री या त्यांची वाट पाहत होत्या. बराच वेळ वाट पाहून देखील ते आले नसल्याने त्यांनी भाऊसाहेब यांना फोन केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे राजश्री या थेट घरी बसने निघाल्या. त्या घरी आल्या असता, त्यांच्या मुलगा आशिषने याने दरवाजा उघडला.

शिक्षकांसमोर विद्यार्थिनीचे कपडे काढून घेतली झडती, घरी जाऊन मुलीची आत्महत्या

यावेळी राजश्री यांनी पती भाऊसाहेब कुठे आहेत असे विचारले, यावेळी राजश्री या घरात गेल्या असता स्वयंपाक खोलीत त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. तर राज नंदिनी देखील मृतावस्थेत त्यांना दिसली. या घटनेमुळे राजश्री या हादरल्या. भाऊसाहेब यांनी आधी मुलीचा खून केला आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वाकड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून घटनास्थळी त्यांना भाऊसाहेब यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेही चिठ्ठी आढळली. यात त्यांनी आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलत असल्याचे लिहिले आहे. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर