मुंबईतील भाईंदर रेल्वे स्टेशनमध्ये बाप-लेकाने लोकलसमोर उडी मारत आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप लेक स्थानकातील फलाटावरून चालत गेले व समोरून येणाऱ्या लोकलखाली झोपले. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेजही समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये दिसते की, वडील आणि मुलगा रेल्वेच्या रुळावर झोपलेले दिसत आहे. दोघेजण अचानक धावत्या लोकलसमोर आल्याने चालकाने लोकल थांबवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र लोकल दोघांच्या अंगावर गेली. मृत बाप-लेक नालासोपारा येथील रहिवासी होते.
सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास भाईंदर स्थानकाच्या प्लेटफॉर्म क्रमांक ६ वर या बाप-लेकाने आत्महत्या केली. वडील हरिश मेहता (वय ६० वर्षे)आणि मुलगा जय मेहता (वय३०)अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार भाईंदर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वर वडील आणि मुलाने आत्महत्या केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या व्हिडिओत दिसते की, वडील आणि मुलगा प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी बोलत विरारच्या दिशेने जाताना दिसत आहेत. त्यानंतर प्लॅटफॉर्मवरून खाली उतरून ते काही अंतर चालून जातात व दोघे पिता-पुत्र विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनसमोर आडवे होतात.
या प्रकरणी वसई पोलिसात नोंद झाली असून तपास सुरू आहे. रेल्वे भाईंदर स्टेशनमधून रवाना होताच बाप लेकांनी रेल्वेखाली स्वत:ला झोकून दिले.दोघांच्या अंगावरून लोकल गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला. भाईंदर रेल्वे स्थानाकातून लोकल निघताच दोन जण रुळावर झोपलेले पाहून ट्रेनच्या चालकाने लोकल ट्रेन थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण ट्रेन थांबली तोपर्यंत दोघेही ट्रेनखाली चिरडले होते. घटनेनंतर मिळालेल्या माहितीनुसार,आत्महत्या केलेले दोघेही पिता-पुत्र असून ते नालासोपारा येथील रहिवासी आहेत.
भाईंदर स्थानकावरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनसमोर उडी मारून या दोघांनी जीवन संपवले. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतले व शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. दोघांकडे सुसाइड नोटही आढळलेली नाही. मात्र रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती-पत्नी आणि सासरच्या लोकांच्या वादातून हा प्रकार घडला आहे. वसई रेल्वे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.