सिल्लोडमध्ये देवीचे विसर्जन करताना बाप-लेकाचा बुडून मृत्यू; कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सिल्लोडमध्ये देवीचे विसर्जन करताना बाप-लेकाचा बुडून मृत्यू; कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

सिल्लोडमध्ये देवीचे विसर्जन करताना बाप-लेकाचा बुडून मृत्यू; कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

Oct 13, 2024 10:58 AM IST

Sillod News : सिल्लोड येथे नवरात्र उत्सवादरम्यान, देवीच्या विसर्जनासाठी पूर्णा नदी पात्रात गेलेल्या बाप लेकाचा बुडून मृत्यू झाला.

सिल्लोडमध्ये देवीचे विसर्जन करतांना बाप-लेकाचा बुडून मृत्यू; कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर
सिल्लोडमध्ये देवीचे विसर्जन करतांना बाप-लेकाचा बुडून मृत्यू; कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर

Sillod News : सिल्लोड येथे देवीच्या विसर्जनादरम्यान एक दु:खद घटना घडली. एक कुटुंबीय देवीच्या विसर्जनासाठी पूर्णांनदी पात्रात गेले असता बाप केलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी केऱ्हाळा येथील बेलेश्वरवाडी येथे घडली. या घटनेमुळे ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.

सांडू नामदेव सागरे (वय ४५), निवृत्ती सांडु सागरे (वय २८, रा. बेलेश्वरवाडी (केऱ्हाळा) असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या बाप लेकाचे नाव आहे. सागरे कुटुंबियांकडे दरवर्षी नवरात्र उत्सवात घरात देवी बसवण्यात येते. शनिवारी नवरात्री उत्सवाची सांगता झाली. घरातील देवीचे विसर्जन करण्यासाठी सांडू सागरे व त्यांचा मुलगा निवृत्ती सागरे हे व आणखी एक जण हे तिघे पूर्णा नदी पात्रा शेजारी गेले होते. यावेळी दोघे जण नदी पात्रात उतरले तर त्यांचा १४ वर्षांचा मुलगा हा नदीच्या किनारी थांबला. यावेळी नदी पत्रातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दोघेही मुलगा आणि वडील हे पाण्यात बुडाले. ही घटना १४ वर्षांच्या मुलाच्या लक्षात आली. त्यांनी हा प्रकार घरी येऊन सांगितला. यावेळी घरच्यांनी व ग्रामस्थांनी तातडीने नदी पात्राकडे धाव घेतली. 

नागरिकांनी नदी पात्रात दोघांचा शोध घेतला. मात्र, दोघेही सापडले नाही. यामुळे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता अग्निशामक दलाने नदी पात्रात शोध घेतला. मात्र, अंधार झाल्याने शोध मोहीम थांबण्यात आली. आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली.

मृत सांडू सागरे हे तालुक्यातील गव्हाली येथील महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. दरम्यान, पूर्णा नदीत वाळू तस्करांनी बुलडोझरने मोठमोठे खड्डे केले आहेत. यामुळे नदीपात्रात पाण्याचा अंदाज येत नाही. त्यात शुक्रवारी रात्री तालुक्यात जोरदार परतीचा पाऊस झाल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली होती. त्यामुळे त्यांना या खड्ड्यांचा अंदाज आला नाही. त्यामुळे ही घटना झाली असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर