मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Junnar Bus Accident : जुन्नर तालुक्यात एसटीचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर ; २ ठार १५ प्रवासी जखमी

Junnar Bus Accident : जुन्नर तालुक्यात एसटीचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर ; २ ठार १५ प्रवासी जखमी

Jul 07, 2024 03:50 PM IST

Junnar Bus Accident : जुन्नर तालुक्यातील नगर कल्याण मार्गावर औतुर जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस आणि कारचा भीषण अपघात झाला असून यात दोन ठार तर १५ जण जखमी झाले आहेत.

junnar Accident
junnar Accident

Junnar Bus Accident : जुन्नर तालुक्यातील नगर कल्याण मार्गावर औतुर जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस आणि कारची एकमेकांना धडक झाली असून यात कारमधील २ जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे समजू शकली नाही. तर बस मधील जखमी प्रवाशांची देखील समजू शकली नाही.

राज्यात गेल्या काही दिवसांनपासून एसटी बसच्या अपघात वाढ झाली आहे. जुन्नर तालुक्यात नगर कल्याण मार्गावर देखील एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार मधील दोघे जण ठार झाले तर १५ प्रवासी जखमी आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

एसटी बस नगर कल्याण मार्गे जात होती. ही बस ओतूर जवळ आली असता, नगर-कल्याण महामार्गावर समोरून कार येत होती. ओतुरजवळ कार आणि एसटीबसचा समोरा समोर येऊन एकमेकांना धडकल्या. ही धडक ऐवढी भीषण होती की, यात कारचा चक्काचूर झाला. तर बसमधील प्रवाशांना हादरा बसला. या कारमधील दोघांचा जागीच मृत्यु झाला तर बसमधील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले त्यांनी बस मधील जखमी प्रवाशांना बाहेर काढले.

तसेच त्यांना उपचारासाठी दवाखान्यात पाठवले. तर पोलीसांन देखील अपघाताची माहिती दिली. ही एसटी बस पारनेरवरुन मुंबईकडे जात होती तर कार आळेफाट्याकडे जात असताना ओतुरजवळ हा अपघात झाला. बसमधील जखमींना प्राथमिक उपचारासाठी आळेफाटा व ओतुर येथे दाखल करण्यात आले आहे.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे समजू शकली नाही. तसेच बस मधील जखमी नागरिकांची देखील नावे समजू शकली नाही.

नालासोपारा येथेही अपघात

नालासोपारा येथे देखील मोठा अपघात झाला आहे. एका ऑईल टँकरने रिक्षाला धडक दिली. हा अपघात पहाटे ५ च्या सुमारास घडला. रिक्षाचालक चहा पिण्यासाठी बाहेर गेल्यामुळे या अपघातातून सुदैवाने बचवला. या धडकेत रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. तर ड्रायव्हरला नागरिकांनी पकडून पोलसांच्या स्वाधीन केले आहे.

WhatsApp channel
विभाग