मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ओला दुष्काळ नाही म्हणणाऱ्या कृषीमंत्र्यांनी आमच्या भागाची पाहणी करावी, शेतकऱ्यांची मागणी

ओला दुष्काळ नाही म्हणणाऱ्या कृषीमंत्र्यांनी आमच्या भागाची पाहणी करावी, शेतकऱ्यांची मागणी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 24, 2022 05:44 PM IST

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत दिवाळी साजरीकरत सरकारी धोरणाचा निषेध केला.

शेतकऱ्यांनी स्मशानभूमीत साजरी केली दिवाळी
शेतकऱ्यांनी स्मशानभूमीत साजरी केली दिवाळी

Farmers Protestin Aurangabad :जुलै महिन्यापासून राज्यात सलग चार महिने पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. यंदाचा पावसाळा जवळपास एक महिनाभर लांबला होता. परतीच्या पावसाने तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. राज्यात अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे. सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे, मात्र शेतकऱ्यांच्या हातात हे अनुदान अजून पडले नाही. याचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत अनोखं आंदोलन केला आहे.

मराठवाड्यात परतीच्या पावसानेकहर केल्याने शेतपिकांचेमोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.या नुकसानीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचीआवश्यकता आहे, मात्रसरकारकडून केवळघोषणाबाजी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत दिवाळी साजरीकरत सरकारी धोरणाचा निषेध केला.गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकऱ्यांनी हे अनोखे आंदोलन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी गावातील स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत अनोखं आंदोलन केलं.

शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कोणतीही शासकीय यंत्रणा पोहोचली नाही. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही भरीव मदत मिळत नसल्याचे चित्र आहे. दिवाळी सारख्या सणासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे गावातील सर्व शेतकरी आज स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मागणीचे निवदेन प्रशासनाला सादर केले आहे.

आंदोलनकर्ते शेतकरी म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्याला पहिल्यांदाच कृषिमंत्री पद मिळाले आहे. मात्र ओला दुष्काळासारखी परिस्थिती नसल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणतात त्यांनी आमच्या भागाची पाहणी करावी. पुढील पंधरा दिवसांत सरकारने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या