ravikant tupkar arrested : शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. बुलढाणा पोलिसांनी तुपकरांवर कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयातून त्यांना अटक करण्यात आली आहे. पिकविम्यासाठी रविकांत तुपकर यांचं बुलढाणा जिल्हा कृषी अधिक्षकांच्या दालनात आंदोलन सुरू होतं. या आंदोलनादरम्यानच त्यांना अटक करण्यात आली आहे.
पिक विम्यासाठी रविकांत तुपकर आक्रमक झाले असून त्यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कक्षात ठिय्या आंदोलन सुरु केले होते. जोपर्यंत पीकविम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही, तोपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कक्षात मुक्काम ठोकणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला होता. शेतकऱ्यांच्या पिकविम्याच्या प्रश्नावरून रविकांत तुपकर आक्रमक झाले होते तसेच गादी आणि उशी घेऊन तुपकर जिल्हा कृषी कार्यालयात दाखल झाले होते.
मला गोळ्या घातल्या तरी शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे. सरकारच्या हुकूमशाहीचा आम्ही निषेध करतो,असं रविकांत तुपकर म्हणाले. शेतकऱ्यांनी गावागावात आंदोलन सुरू करण्याचे आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलं आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा मागणाऱ्या रविकांत तुपकरांवर गुन्हा दाखल करता मग शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल का करत नाहीत? असा सवाल ऍडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी केला आहे. राज्यात विमा कंपनीचे अधिकारी पैसे मागत असतील तर त्या अधिकाऱ्यांना ठोकून काढा, असे आवाहन शेतकऱ्यांना केलं आहे.
राज्यात चौथ्या आघडीबाबत सध्या काहीच सांगू शकत नाही पण राजकारणात काहीही अशक्य नाही. हे सुद्धा होऊ शकतं. वंचित सोबत आघाडी आमची अजून बोलणी झालेली नाहीत. मी तिसऱ्या आघाडीत कधीही गेलो नाही आणि माझा तिसऱ्या आघाडीशी संबंध नाही. आगामी विधानसभा कोणत्या मतदार संघातून लढणार ते येत्या तीन ते चार दिवसात सांगतो असे तुपकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर माझ्यासाठी खूप आदरणीय आहेत. लोकसभेत ते मला पाठिंबा देणार होते पण एका व्यक्तीला शब्द दिल्याने ते होऊ शकलं नाही. आंबेडकरांकडून प्रस्ताव आल्यास नक्कीच कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल. मलाही अनेक आणि विविध पक्षांच्या ऑफर आहेत. लवकरच वंचितशी बोलणी करून आघाडीबद्दल निर्णय घेतला जाईल.