मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Farmer suicide : विष प्राशन करून मुलाशी बोलून सोडला जीव; यवतमाळ जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer suicide : विष प्राशन करून मुलाशी बोलून सोडला जीव; यवतमाळ जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 27, 2022 09:15 AM IST

Farmer suicide in Yawatmal : भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.

शेतकऱ्याची आत्महत्या
शेतकऱ्याची आत्महत्या

यवतमाळ : विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र काही केल्या थांबण्याचे चित्र दिसत नाही. यवतमाळ जिल्ह्यात आणखी एका अल्पभूधारक शेतकाऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने आपल्या मुलाला व्हिडिओ कॉल करत आत्महत्या करत असल्याचे सांगितले. भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे यवतमाळ हादरले आहे. म्हैसदोडका येथील एका सालदाराने देखील मंगळवारी सकाळी आत्महत्या केली होती.

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील चोपण या गावात ही घटना घडली आहे. सचिन विठ्ठल ढोरे (वय ३७, रा. चोपण) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. येन दिवाळीत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन ढोरे हा अल्पभूधारक शेतकरी आहे. त्यांच्याकडे पाच एकरपेक्षा कमी शेती आहे. या शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. यावर्षी पाऊस झाला. मात्र, अति प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतील लावलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले. पेरणीचा खर्चही वसूल न झाल्याने खायचे काय हा प्रश्न त्याला सारखा सतावत होता. सरकारने देखील कुठलीही मदत न केल्याने त्यांच्या विवंचनेत आणखी भर पडली.

यामुळे अखेर सचिनने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी तो शेतात गेला. सायंकाळी विष प्राशन केल्यानंतर त्याने त्यांच्या बायकोला व्हीडिओ कॉल केला. मला मुलांशी अखेरचे बोलायचे आहे, त्यांचा चेहरा बघायचा आहे, असे त्याने सांगितले. मात्र, नवरा गंमत करत असेल असे वाटून तिने फोन मुलाकडे दिला. सचिनने मुलाशी बोलून फोन बंद केला. त्यानंतर तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. दरम्यान, जंगलात सचिनचा मृतदेह आढळला.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग