Gautami Patil in Book Festival : आपल्या नृत्यांमुळे व मनमोहक अदांमुळे चाहत्यांना भुरळ पाडणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने शनिवारी पुण्यात फर्ग्युसन कॉलेज येथे सुरू असणाऱ्या पुणे बूक फेस्टिव्हलला भेट दिली. यावेळी गौतमीने पुणेकर वाचकांचे कौतुक करत तिला काय वाचायला आवडेल याची माहिती देत येथे आलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
पुण्यामध्ये सध्या ‘पुणे बूक फेस्टिव्हल’ सुरू आहे. आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. या प्रदर्शनाला पुण्यातूनच नाही तर देशभरातून आलेल्या नागरिकांनी व वाचन वेड्या तरुणांनी भेट दिली आहे. या प्रदर्शनात लाखों रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. याच बूक फेस्टिव्हलला प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने शनिवारी भेट दिली.
पुस्तक प्रदर्शनाला भेट दिल्यावर गौतमी पाटील हिने उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. गौतमी म्हणाली, ‘ आतापर्यंत मी नाचायला जात असे, मात्र, आज मी वाचायला आले आहे’ या बूक फेस्टिव्हलमध्ये येऊन मी खूप उत्साहित झाले आहे. मी नेहमी नृत्य करत असते. माझा वाचनाशी फारसा संबंध आला नाही. मात्र, आज मी या ठिकाणी वाचनासाठी आले आहे. या पुढे मी फावल्या वेळेत वाचनाची सवय जोपासणार असल्याचे गौतमी म्हणाली.
गौतमी म्हणाली, मी लहानपणापासून अशा प्रदर्शनात कधी गेलेच नाही. मी फक्त नृत्य करत होते. या ठिकाणी मी आज काही तरी वेगळं करण्यासाठी आले आहे. आज पर्यंत मला पुस्तकं वाचायची संधि मिळाली नाही. मात्र, येथे येऊन मी पुस्तकांच्या या दुनियेत फेरफटका मारणार आहे. पुस्तक ही खूप छान गोष्ट आहे , त्यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळतं, मीही आता वाचाणार आहे, तु्म्हीही सर्वांनी नक्की वाचा, असे आवाहन देखील यावेळी गौतमीने केले. दरम्यान, पुस्तक प्रदर्शनात येताना कोणती पुस्तकं घ्यायची व कोणती वाचायची हे ठरवून आले नाही. प्रवीण तरडे दादांना मी सांगितलं की तुम्ही मला काही पुस्तकांची नावं सुचवा तसेच मी कोणती पुस्तकं घेऊ ते सांगा. पण मी, छत्रपती शिवाजी महाराजाचं पुस्तक नक्की घेणार असून ते आवडीने वाचणार असल्याचं गौतमी म्हणाली.
संबंधित बातम्या