Pune murder : पत्नीचा गळा चाकूने चिरून हत्या; पुण्यातील सातारा रस्त्यावरील लॉजमधील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune murder : पत्नीचा गळा चाकूने चिरून हत्या; पुण्यातील सातारा रस्त्यावरील लॉजमधील घटना

Pune murder : पत्नीचा गळा चाकूने चिरून हत्या; पुण्यातील सातारा रस्त्यावरील लॉजमधील घटना

Jun 16, 2024 03:07 PM IST

pune murder : पुण्यात सातारा मार्गावर एका लॉजमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने गळा चिरून तिची हत्या करण्यात करण्यात आली.

पत्नीचा गळा चाकूने चिरून हत्या; पुण्यातील सातारा रस्त्यावरील लॉजमधील घटना
पत्नीचा गळा चाकूने चिरून हत्या; पुण्यातील सातारा रस्त्यावरील लॉजमधील घटना

Pune satara road crime : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सातारा रोड येथील एका लॉजमध्ये कौटुंबिक वादातून एका पतीने पत्नीचा चाकूने गळा चिरून तिची हत्या केल्याने खबळल उडाली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. आरोपीने लॉजच्या खोलीची कडी लावून घटनास्थळापासून फरार झाला आहे. या प्रकरणी भरती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

काजल कृष्णा कदम (वय २७) असे हत्या करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे तर कृष्णा कदम असे आरोपीचे नाव आहे. काजल व कृष्णा हे दोघेही मजूरी करतात. कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात गेल्या काहिड दिवसांपासून वाद सुरू होते. या वादामुळे दोघेही घटस्फोट देखील घेणार होते. मात्र, समजूददारीने वागण्याचे ठरवत पुन्हा एकत्र आले होते. दरम्यान, शनिवारी दुपारी दोघेही सातारा मार्गावरील अश्विनी लॉजमध्ये आले. दोघांनी लॉजमधील खोलीत दारू प्यायली. नशेत असतांना दोघांमध्ये पुन्हा वाद झाले. याच वादात रागाच्या भरात कृष्णाने चाकूने काजलचा गळा चिरला. त्यानंतर कुणाला ही बाब कळू नये यासाठी त्याने लॉजच्या खोलीला दरवाजा बाहेरून बंद करून फरार झाला.

फरार झाल्यावर कृष्णाने काजलचा खून केल्याची माहिती मित्राला दिली. मित्राने ही बाब भारती विद्यापीठ पोलिसांना दिली. दरम्यान, पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी काजल लॉजमधील खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी पाठवला आहे. तसेच आरोपी कृष्णाचा पोलिस शोध घेत आहेत.

पुण्यात मुलीवर अत्याचार

पुण्यात भरती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका सावत्र बापाने चार वर्षांच्या मुलीला चाकूने चटके देत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी शाळेत रडत असल्याने तिचे समुपदेश केल्यावर ही घटना पुढे आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी आरोपी नराधम बापाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर