मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune kayani bakery fraud: पुण्यातील प्रसिद्ध कयानी बेकरीच्या नावाने बनावट वेबसाईट; सायबर चोरट्यांनी अनेकांना लुबाडले

Pune kayani bakery fraud: पुण्यातील प्रसिद्ध कयानी बेकरीच्या नावाने बनावट वेबसाईट; सायबर चोरट्यांनी अनेकांना लुबाडले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 20, 2024 04:10 PM IST

Pune kayani bakery cyber fraud: पुण्यातील कयानी बेकरीच्या नावाने बनावट संकेतस्थळ ओळखून सायबर चोरट्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

Pune kayani bakery cyber fraud
Pune kayani bakery cyber fraud

Pune kayani bakery cyber fraud : पुण्यातील सुप्रसिद्ध कयानी बेकरी चे नाव वापरून मोठा सायबर घोटाळा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी "कयानी बेकरी" नावाने बनावट वेबसाईट आणि गुगल लिस्टिंग तयार करून अनेकांना गंडा घातला आहे. कयानी बेकरीचे मालक रुस्तम कयानी यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे.

कयानी बेकरीच्या नावाने सायबर चोरट्यांनी बनावट वेबसाइट तयार केली. या बोगस बसाईट आणि गुगल लिस्टिंगवरील मोबाइलला नंबरवर फोन करून अनेक ग्राहकांनी बेकरीतील विविध पदार्थ विकत घेण्यासाठी ऑर्डर दिल्या होत्या. दरम्यान, सायबर चोरट्यांनी ग्राहकांना बेकरी पदार्थ विक्रीच्या निमित्ताने व्हाट्सअप वर QR कोड आणि OTP पाठवून त्यांच्या खात्यातील हजारो रुपये लंपास केले. ग्राहकांचे पैसे खात्यातून गेले असून शिवाय ग्राहकांना बेकरी पदार्थाची डिलिव्हरी देखील दिली जात नव्हती. अशा फसवणूक झालेल्या ग्राहकांनी थेट कयानी बेकरीत जात तक्रारी दिल्या आहेत.

दरम्यान, कयानी बेकरी कोणत्याही फोन नंबर द्वारे ऑनलाईन विक्री करीत नाही. तेंव्हा आपल्या नावाने मोठा सायबर घोटाळा सुरु असल्याचे लक्षात आल्याने कयानी बेकरीच्या मालकांनी पुणे शहर पोलिसांकडे (लष्कर पोलीस ठाणे) तक्रार अर्ज दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेद्र मोरे चौकशी करत आहेत. अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

WhatsApp channel