मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Fact check : मुंबई भाजपच्या निवडणूक प्रचार साहित्यात सोन्याची बिस्किटं? काय आहे सत्य?

Fact check : मुंबई भाजपच्या निवडणूक प्रचार साहित्यात सोन्याची बिस्किटं? काय आहे सत्य?

The Quint HT Marathi
May 14, 2024 07:29 PM IST

Fact Check on Mumbai BJP Election Kit : मुंबई भाजपच्या निवडणूक प्रचार साहित्यात सोन्याच्या बिस्किटांचा समावेश असल्याचा एका व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामागचं वास्तव काय आहे? पाहूया…

Fact check : मुंबई भाजपच्या निवडणूक प्रचार साहित्यात सोन्याची बिस्किटं? काय आहे सत्य?
Fact check : मुंबई भाजपच्या निवडणूक प्रचार साहित्यात सोन्याची बिस्किटं? काय आहे सत्य?

Fact Check on Mumbai BJP Election Kit : मुंबई पोलीस भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचार साहित्याची तपासणी करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मुंबईतील घाटकोपर भागात भाजपनं सोन्याची बिस्किटं वाटल्याचा दावा या व्हिडिओच्या आधारे करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'क्विंट'ला आपल्या व्हॉट्सॲप टिपलाइनवर या व्हिडिओची शहानिशा करणारी एक विनंती आली होती.

(या पोस्टच्या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट इथं आणि इथं एकत्रित पाहता येऊ शकतात.)

भाजपच्या प्रचार साहित्याबाबत 'एक्स'वर आलेली एक पोस्ट
भाजपच्या प्रचार साहित्याबाबत 'एक्स'वर आलेली एक पोस्ट

सत्य काय आहे?

हा दावा खोटा आहे. व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात एक प्लास्टिकची परफ्यूमची बाटली दिसत आहे, जी सोन्याचे बिस्किट म्हणून दाखवली जात आहे.

आम्हाला सत्य कसे कळले?

आम्ही 'गोल्ड बिस्किट बीजेपी किट मुंबई' हा कीवर्ड वापरून Google वर शोध घेतला. त्यातून आम्हाला एनडीटीव्हीनं दिलेलं ११ मे पासूनचं वृत्त सापडलं.

उत्तर मध्य मुंबईतील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अजय बडगुजर यांनी या व्हायरल व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भाजपचं किट दिसत आहे. यात पोस्टर, बॅनर आणि प्लास्टिकच्या परफ्यूमची बाटली आहे.

बडगुजर यांनी पुढं असं सांगितलं की, जेव्हा हा व्हिडिओ शूट केला जात होता, तेव्हा त्यांना पोलिस ठाण्यात तासनतास थांबवून ठेवलं गेलं होतं, त्यामुळं वैतागून त्यांनी एका प्रश्नाला उपरोधिकपणे उत्तर दिलं. परफ्यूमच्या बाटलीला ते सोन्याचं बिस्किट म्हणाले. मात्र, प्रत्यक्षात तसं काही नव्हतं.

अजय बडगुजर एनडीटीव्हीच्या मुलाखतीत खुलासा करताना....
अजय बडगुजर एनडीटीव्हीच्या मुलाखतीत खुलासा करताना....

व्हिडिओच्या शेवटी एनडीटीव्हीचे रिपोर्टर सुनील कुमार सिंग यांनी प्लास्टिकची परफ्यूमची बाटली धरली आणि बाटलीचे तोंडू दाबून परफ्यूम स्प्रे देखील केला.

या वृत्ताचा आधार घेऊन आम्ही फेसबुकवर बडगुजर यांचं प्रोफाइल शोधलं आणि त्यांचं अकाऊंट सापडलं. तिथं त्यांचा संपर्क क्रमांकही होता.

WebQoof टीमनं बडगुजर यांच्याशी संवाद साधला. व्हायरल व्हिडिओमधील भाजपच्या प्रचार साहित्यात सोन्याचं बिस्किट म्हणून जी वस्तू दाखवली जात आहे ती परफ्यूमची बाटलीच होती, यास त्यांनी दुजोरा दिला.

निष्कर्ष: मुंबईत भाजपनं त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या किटमधून सोन्याची बिस्किटं वाटल्याचा दावा खोटा आहे.

(डिस्क्लेमर: ही बातमी मुळात 'द क्विंट'नं प्रकाशित केली होती. ‘शक्ती कलेक्टिव्ह’चा एक भाग म्हणून एचटी डिजिटल मीडियानं ती पुन्हा प्रकाशित केली आहे.)

IPL_Entry_Point