Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Boom HT Marathi
Updated Jun 12, 2024 12:15 PM IST

Boom Fact Chack : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांच्या निवडणूक प्रचार रॅलीत पाकिस्तानचा झेंडा असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, बूमने केलेल्या फॅक्टचेक मध्ये हे खोटे असल्याचे आढळले आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांच्या निवडणूक प्रचार रॅलीत पाकिस्तानचा झेंडा असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, बूमने केलेल्या फॅक्टचेक मध्ये हे खोटे असल्याचे आढळले आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांच्या निवडणूक प्रचार रॅलीत पाकिस्तानचा झेंडा असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, बूमने केलेल्या फॅक्टचेक मध्ये हे खोटे असल्याचे आढळले आहे.

Pakistan Flag in uddhav thackeray party leader rally: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांच्या १४ मे रोजी मुंबईत आयोजित निवडणूक प्रचार रॅलीत पाकिस्तानचा झेंडा असल्याचा दावा नीलेश राणे यांनी केला होता. या ध्वजाचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मात्र, बूमने या व्हिडिओ मागचे सत्य पुढे आणले आहे. हा ध्वज पाकिस्तानचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रॅलीमध्ये दिसणारा ध्वज हा पाकिस्तानचा नसून मुस्लिम समुदायाचा आहे. जो अनेकदा चुकीच्या पद्धतीने पुढे आणला जातो.

 

Pakistan Flag in uddhav thackeray party leader rally
Pakistan Flag in uddhav thackeray party leader rally

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दक्षिण मुंबईतील उमेदवार अनिल देसाई यांच्या १४ मे रोजी आयोजित निवडणूक प्रचार रॅलीमध्ये मुस्लिमांचा धार्मिक ध्वज असलेला व्हीडिओ शेयर करून तो पाकिस्तानचा ध्वज असल्याचा आरोप करण्यात आला. हा व्हिडिओ नीलेश राणे यांनी ट्विट देखील केला आहे. मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी २० मे रोजी मतदान होणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष इंडिया आघाडीत सहभागी आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार व इतर काही पक्ष असून हे पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील असलेल्या महायुती विरोधात लढत आहेत.

हा व्हायरल व्हिडिओ भाजप नेते नीलेश राणे यांनी ट्विटरवर पोस्ट केला होता, यात त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या नेट्याच्या मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा! आता काय PFI , SIMI, AL QAEDA चे लोक मातोश्रीत बिर्याणी घेऊन जातील का असा सवाल त्यांनी विचारला. तसेच हे लोक दाऊदच मुंबईत स्मारक पण बांधतील. आणि म्हणे हा मा. बाळासाहेबांचा “असली संतान” असे लिहीत नीलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका देखील केली होती.

fact chack
fact chack

हा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच फेसबुकवर देखील मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'उबाठा उमेदवार अनिल देसाई यांचा चेंबूरमधील प्रचार...... भारतात पाकिस्तानचा झेंडा... हतबलता पहा..... बाळासाहेबांना कसे वाटेल.... उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्यने शिवसेनेची किंमत कमी केली आहे.... मराठी माणूस या तिघांच्या सहानुभूतीच्या खेळीला बळी पडणार नाही याची मला खात्री आहे..... मला आशा आहे की महाराष्ट्राचे मतदार योग्य उत्तर देतील, असे देखील ट्विटमध्ये म्हटले आहे.

बूम फॅक्ट चेक

मुंबईतील चेंबूर येथे शिवसेना (UBT) नेते अनिल देसाई यांच्या रोड शोमधील व्हायरल व्हिडिओमधील ध्वज हा इस्लामिक ध्वज आहे. तो पाकिस्तानी ध्वज नाही, असा दावा सोशल मीडिया पोस्टमध्ये केला जात असल्याचे फॅक्टचेकमध्ये बूमला आढळले आहे. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यावर हे स्पष्ट होते की हा ध्वज पाकिस्तानचा नसून इस्लामिक ध्वज आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या हिरव्या ध्वजात मध्यभागी पांढरा चंद्रकोर आणि तारा आहे, जो बहुतेक वेळा मोहरम आणि ईद मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकांमध्ये दिसतो. व्हायरल व्हिडिओमधील ध्वजावर पांढरे ठिपकेही आहेत. तर, पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजात डावीकडे पांढरा स्तंभ आहे. दोन ध्वजांमधील तुलना खाली पाहिली जाऊ शकते.

 

 मुंबईतील चेंबूर येथे शिवसेना (UBT) नेते अनिल देसाई यांच्या रोड शोमधील व्हायरल व्हिडिओमधील ध्वज हा इस्लामिक ध्वज आहे.
मुंबईतील चेंबूर येथे शिवसेना (UBT) नेते अनिल देसाई यांच्या रोड शोमधील व्हायरल व्हिडिओमधील ध्वज हा इस्लामिक ध्वज आहे.

बूमने यापूर्वी सोशल मीडिया पोस्ट्ससह चुकीची माहिती काढून टाकली आहे. हा ध्वज पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज म्हणून चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्याशिवाय, व्हिडिओ चेंबूरचा असल्याचा दावा देखील करण्यात आला होता. ज्या ठिकाणी व्हिडिओ काढण्यात आला तेथील परिसराचे गूगल नकाशे देखील बूमने तपासले आणि त्यात आढळले की व्हायरल व्हिडिओ एका रस्त्यावर शूट केला गेला होता. चेंबूर स्टेशन जवळ. ५ पीएल लोखंडे मार्ग, चेंबूर येथे पार्श्वभूमीत हाच फ्लायओव्हर आणि बुलडींग्स ​​गुगल मॅपववरील ठिकाण आणि व्हायरल व्हिडिओमधील जागा जुळतात.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देसाई यांनी १४ मे २०२४ रोजी चेंबूरमध्ये रोड शो केला होता. खालील इंस्टाग्राम पोस्टमध्ये रोड शो आणि तो आयोजित केलेल्या ठिकाणांचा उल्लेख आहे.

या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला (UBT) मुंबईतील मुस्लिमांचा पाठिंबा मिळत असल्याचं वृत्त आहे.

(डिस्क्लेमर: ही मूळ बातमी BOOM मध्ये प्रकाशित झाली आहे. एचटी मराठीने शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून ही बातमी पुर्नप्रकाशित केली आहे.)

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर