ओयोवर नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार! अल्पवयीन पीडितेनं टोकचं पाऊल उचलत घेतला गळफास; बदलापूरनंतर बल्लारपूर हादरलं-extreme step of 17 year old rape victim incident at ballarpur of chandrapur ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ओयोवर नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार! अल्पवयीन पीडितेनं टोकचं पाऊल उचलत घेतला गळफास; बदलापूरनंतर बल्लारपूर हादरलं

ओयोवर नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार! अल्पवयीन पीडितेनं टोकचं पाऊल उचलत घेतला गळफास; बदलापूरनंतर बल्लारपूर हादरलं

Sep 05, 2024 06:51 AM IST

Ballarpur crime : बदलापूर येथे दोन मुलींवर अत्याचाराची घटना ताजी असतांना आता बल्लारपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीच्या मित्राने मुलीला हॉटेलमध्ये नेत तिच्यावर बलात्कार केंला. यानंतर मुलीने आत्महत्या केली.

ओयोवर नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार! अल्पवयीन पीडितेनं टोकचं पाऊल उचलत घेतला गळफास; बदलापूरनंतर बल्लारपूर हादरलं
ओयोवर नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार! अल्पवयीन पीडितेनं टोकचं पाऊल उचलत घेतला गळफास; बदलापूरनंतर बल्लारपूर हादरलं

Ballarpur crime : राज्यात अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. बदलापूर येथील दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतांना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीला ओयो हॉटेलमध्ये नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. ही घटना पीडिटेच्या घरी कळल्यावर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या नंतर पीडित १७ वर्षांच्या मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आरोपीवर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बल्लारपूरमध्ये तणावाची स्थिती आहे.

शिवम दुपारे (वय २०) असे आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी शिवमने पीडित मुलीला २ सप्टेंबर रोजी रात्री ओयो हॉटेलवर घेऊन जात बलात्कार केला. यानंतर ही घटना मुलीच्या कुटुंबीयांना समजली. त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र, बादनामीच्या भीतीपोटी मुलीने टोकाचं पाऊल उचललं. तिने तिच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आरोपी हा पीडित मुलीचा मित्र आहे. दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. याच जवळीक मधून आरोपीने मुलीला गावातील एका लॉजवर नेले आणि त्याने तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणाची माहिती घरच्यांपर्यंत पोहोचल्यावर मुलीच्या घरच्यांनी या प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुलीच्या मित्राला रात्री अटक केली आहे. दरम्यान, त्याच रात्री मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस मुलीच्या आत्महत्या का केली याचा तपास करत आहेत.

बल्लारपूरमध्ये तनाव

या घटनेनंतर बल्लारपूर शहरात तनाव निर्माण झाला आहे. नागरिकांनी या घटनेविरोधात संताप व्यक्त केला आहे. शहरात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. या प्रकरणी हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीला प्रवेश दिल्यामुळे ओयो हॉटेल मालकावरही कारवाई होणार आहे.

बदलापूर येथे शाळेत दोन मुलींवर अत्याचार

गेल्या महिन्यात बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाले होते. या घटनेमुळे राज्यभर संताप उसळला होता. मोठे आंदोलन या ठिकाणी झाले होते. आरोपील फाशी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली होती. दरम्यान, या प्रकरणी एसआयटीची स्थापना देखील करण्यात आली होती.

विभाग